Skip to content

Pune Crime : पुण्यातील विषारी दारूकांड प्रकरणातील मुख्य फरार आरोपी जेरबंद

Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : पुणे शहरात खळबळ उडवून देणाऱ्या हडपसर विषारी दारूकांड प्रकरणातील फरार आरोपी दत्ता उर्फ भावड्या भीमराव लोंढे (रा.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

पुण्यातील विषारी दारूकांड प्रकरणातील मुख्य फरार आरोपी जेरबंद
पुण्यातील विषारी दारूकांड प्रकरणातील मुख्य फरार आरोपी जेरबंद

Pune Crime : उरुळी कांचन पोलिसांसह गुन्हे अन्वेषण पथकाची कामगिरी

Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : पुणे शहरात खळबळ उडवून देणाऱ्या हडपसर विषारी दारूकांड प्रकरणातील फरार आरोपी दत्ता उर्फ भावड्या भीमराव लोंढे (रा. पांढरस्थळ, उरुळी कांचन) याला उरुळी कांचन पोलीस आणि गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने संयुक्त कारवाई करत ताब्यात घेतले आहे.https://maharashtramirror.com/ Pune crime

पुणे शहर हद्दीत घडलेल्या या विषारी दारूकांडात बावीसहून अधिक नागरिकांचा बळी गेला होता. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाणे आणि दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्याती सराईत आरोपी दत्ता लोंढे हा घटनेनंतर फरार झाला होता. तो शिंदवणे घाट परिसरात वेशांतर करून आणि स्वतःचे रूप बदलून फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शोधमोहीम राबवली असता, पुणे जिल्ह्यातील पुरदंर तालुक्यातील राजेवाडी येथे तो स्वतःची ओळख लपवून आणि वाहनाची नंबरप्लेट बदलून पळून जाण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी तेथे धाड टाकून त्याला ताब्यात घेतले.https://maharashtramirror.com/ Pune crime

ही कारवाई उरुळी कांचनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार आणि त्यांच्या पथकाने केली. आरोपीला पुढील तपासासाठी गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपअधीक्षक शामराव काळे यांच्या पथकाकडे सोपवण्यात आले आहे.

Share