Skip to content

Pune News : पुण्यात गणेशोत्सवात ५ दिवस मध्यरात्री १२ वाजेपर्यंत डीजे आणि लाऊडस्पीकरला परवानगी

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : पुण्यातील गणेशोत्सवाचा उत्साह आणि मध्यवर्ती भागातील गर्दी विचारात घेता, जिल्हा प्रशासन व पुणे पोलिसांनी सार्वजनिक गणेश मंडळांना मोठा दिलासा दिला आहे.

VK
Vikrant Kulkarni

2 min read

पुण्यात गणेशोत्सवात ५ दिवस मध्यरात्री १२ वाजेपर्यंत डीजे आणि लाऊडस्पीकरला परवानगी प्रशासनाचा निर्णय, सुरक्षेसाठी ड्रोनवर बंदी
पुण्यात गणेशोत्सवात ५ दिवस मध्यरात्री १२ वाजेपर्यंत डीजे आणि लाऊडस्पीकरला परवानगी प्रशासनाचा निर्णय, सुरक्षेसाठी ड्रोनवर बंदी

Pune News :प्रशासनाचा निर्णय, सुरक्षेसाठी ड्रोनवर बंदी

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : पुण्यातील गणेशोत्सवाचा उत्साह आणि मध्यवर्ती भागातील गर्दी विचारात घेता, जिल्हा प्रशासन व पुणे पोलिसांनी सार्वजनिक गणेश मंडळांना मोठा दिलासा दिला आहे. यंदाच्या गणेशोत्सवात ५ दिवस रात्री १२ वाजेपर्यंत डीजे आणि लाऊडस्पीकर वाजवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच या पाच दिवसांत भाविकांना मध्यरात्रीपर्यंत देखावे पाहण्याची मुभा असणार आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

प्रशासनाने जाहीर केलेल्या आदेशानुसार, १९ सप्टेंबर, २० सप्टेंबर, २२ सप्टेंबर, २३ सप्टेंबर आणि २५ सप्टेंबर या पाच दिवसांमध्ये लाऊडस्पीकर व डीजेच्या वापराची मुदत मध्यरात्री १२ वाजेपर्यंत वाढवून देण्यात आली आहे. इतर दिवशी मात्र रात्री १० वाजताच ध्वनिक्षेपक बंद करण्याचे बंधनकारक राहील. विसर्जन मिरवणुका आणि देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या अलोट गर्दीचे नियोजन सुलभ व्हावे, यासाठी ही सवलत देण्यात आली आहे.https://maharashtramirror.com/ pune News

सुरक्षा आणि गर्दीच्या नियोजनास सर्वोच्च प्राधान्य
पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत माहिती दिली. "गणेशोत्सवाच्या काळात मध्यवर्ती पुण्यातील रस्त्यांवर आणि प्रमुख गणपती मंडळांजवळ भाविकांची अभूतपूर्व गर्दी होते. या पार्श्वभूमीवर वाहतूक नियंत्रण, गर्दीचे व्यवस्थापन आणि भाविकांची सुरक्षा यावर पोलिसांचा मुख्य भर असेल. सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही," असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.

अनधिकृत ड्रोन उडवण्यावर बंदी
सुरक्षिततेचा उपाय म्हणून शहराच्या मध्यवर्ती भागात विनापरवाना ड्रोन उडवण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. गर्दीची ठिकाणे, प्रमुख गणेश मंडळे आणि विसर्जन मिरवणूक मार्गांवर ही बंदी लागू राहील. नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी विशेष 'ड्रोन जप्ती पथक' तैनात केले आहे. केवळ नामांकित मंडळांनी रीतसर परवानगी घेतलेल्या ड्रोनलाच यातून सूट देण्यात येणार आहे.

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या आगमनामुळे सुरक्षाव्यवस्थेत वाढ
गणेशोत्सवादरम्यान शहरात अनेक अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटीचे नियोजन आहे. यामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह प्रमुख राजकीय नेते बाप्पाच्या दर्शनासाठी पुण्यात दाखल होत आहेत.

दुसरीकडे, मराठा क्रांती मोर्चाचे नेते मनोज जरांगे-पाटील हेदेखील मुंबईच्या दिशेने कूच करत आहेत. त्यांचा ताफा १७ सप्टेंबरच्या संध्याकाळी लोणी काळभोर येथील विवाह कार्यालयात मुक्कामी असेल. त्यानंतर १८ सप्टेंबरच्या सकाळी ते दुपारी या वेळेत त्यांचा ताफा स्वारगेट, कर्वेनगर आणि चांदणी चौक मार्गे मुंबईकडे रवाना होणार आहे.

या सर्व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या हालचाली आणि गणेशोत्सवाचा अलोट जनसागर लक्षात घेता, पुणे शहर पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला असून ठिकठिकाणी अतिरिक्त पोलीस बळ वाढवले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Share