Pune News : गणेशोत्सवात पुण्याच्या मध्यवर्ती भागात अवजड वाहनांना बंदी
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर: गणेशोत्सवाच्या काळात पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात होणारी भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी जड आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घातले आहेत.
2 min read

Pune News : १२ ते २६ सप्टेंबरपर्यंत २४ तास निर्बंध; शहरातील १२ प्रमुख मार्गांचा समावेश
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर: गणेशोत्सवाच्या काळात पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात होणारी भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी जड आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घातले आहेत. शहरातील प्रमुख १२ मार्गांवर १२ ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत गणपती विसर्जनापर्यंत २४ तास जड आणि अवजड वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहने आणि गणेशोत्सवाच्या देखाव्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना मात्र या निर्बंधातून वगळण्यात आले आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
गणेशोत्सवात पुण्याच्या मध्यवर्ती भागातील लक्ष्मी रोड, टिळक रोड, कुमठेकर रोड, बाजीराव रोड, शिवाजी रोड, केळकर रोड यांसह प्रमुख रस्त्यांवर भाविकांची मोठी गर्दी होते. गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी शहरासह उपनगर आणि जिल्ह्यातूनही मोठ्या संख्येने नागरिक मध्यवर्ती भागात येतात. त्यामुळे वाहनांची वाढणारी संख्या, पादचाऱ्यांची गर्दी आणि संभाव्य वाहतूक कोंडी लक्षात घेऊन वाहतूक शाखेने यंदाही विशेष वाहतूक नियोजन केले आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
पोलीस उपायुक्त (वाहतूक) डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी मोटार वाहन कायद्यातील कलम ११५, ११६(१)(ए)(बी), ११६(४) आणि ११७ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीसंदर्भातील आदेश जारी केला आहे.https://maharashtramirror.com/ pune News
या १२ प्रमुख मार्गांवर निर्बंध
आदेशानुसार, शास्त्री रोडवर सेनादत्त चौकी चौक ते अलका चौक, टिळक रोडवर जेधे चौक ते अलका चौक, कुमठेकर रोडवर शनिपार ते अलका चौक, लक्ष्मी रोडवर संत कबीर चौक ते अलका चौक आणि केळकर रोडवर फुटका बुरुज ते अलका चौक या मार्गांवर जड-अवजड वाहनांची वाहतूक बंद राहणार आहे.
त्याचप्रमाणे बाजीराव रोडवर पुरम चौक ते गाडगीळ पुतळा, शिवाजी रोडवर गाडगीळ पुतळा ते जेधे चौक, कर्वे रोडवर नळस्टॉप चौक ते खंडोजीबाबा चौक, फर्ग्युसन कॉलेज रोडवर खंडोजीबाबा चौक ते वीर चाफेकर चौक आणि जंगली महाराज रोडवर स. गो. बर्वे चौक ते खंडोजीबाबा चौक या मार्गांवरही हे निर्बंध लागू असतील.
सिंहगड रोडवर राजाराम ब्रिज ते सावरकर चौक, तसेच गणेश रोड-मुदलियार रोडवर पॉवर हाऊस दारुवाला ते जिजामाता चौक आणि पुढे फुटका बुरुज चौक या मार्गावरही जड आणि अवजड वाहनांना प्रवेश करता येणार नाही.
१२ सप्टेंबरपासून २४ तास बंदी
हे वाहतूक निर्बंध १२ सप्टेंबरपासून लागू होणार असून २६ सप्टेंबरपर्यंत गणपती विसर्जनाच्या कालावधीत २४ तास कायम राहणार आहेत. त्यामुळे मालवाहतूकदार आणि जड वाहनचालकांनी मध्यवर्ती भागातील या मार्गांचा वापर टाळून पर्यायी मार्गांचा अवलंब करणे आवश्यक ठरणार आहे.
गणेशोत्सवाच्या काळात मध्यवर्ती पुण्यात भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. विशेषतः सायंकाळनंतर मानाचे गणपती आणि प्रमुख मंडळांचे देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होते. पादचारी आणि वाहनांची एकाच वेळी होणारी वर्दळ लक्षात घेता अपघात टाळणे आणि वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
अत्यावश्यक सेवांना सूट
या आदेशातून अत्यावश्यक सेवेतील वाहनांना सूट देण्यात आली आहे. अग्निशमन दलाची वाहने, पोलीस वाहने तसेच गणेशोत्सवातील देखावे वाहून नेणारी वाहने या मार्गांवर आवश्यकतेनुसार ये-जा करू शकतील.
वाहनचालकांनी गणेशोत्सवाच्या कालावधीत वाहतूक पोलिसांनी लागू केलेल्या निर्बंधांची नोंद घेऊन नियोजित मार्गांऐवजी उपलब्ध पर्यायी मार्गांचा वापर करावा. तसेच मध्यवर्ती भागातील गर्दी आणि वाहतूक व्यवस्थापन लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


