Skip to content

Pune News : गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे स्वारगेट व डेक्कन येथील बसस्थानकांचे तात्पुरते स्थलांतर

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वारगेट चौक आणि डेक्कन चौक परिसरातील वाहतूक बंद राहणार आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे स्वारगेट व डेक्कन येथील बसस्थानकांचे तात्पुरते स्थलांतर
गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे स्वारगेट व डेक्कन येथील बसस्थानकांचे तात्पुरते स्थलांतर

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वारगेट चौक आणि डेक्कन चौक परिसरातील वाहतूक बंद राहणार आहे. या काळात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. कडून स्वारगेट आणि डेक्कन परिसरातील काही बसस्थानकांचे तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर करण्यात आले आहे. https://maharashtramirror.com/ Pune News
गणेश विसर्जनाच्या दिवशी शहरातील शिवाजी रोड, बाजीराव रोड, लक्ष्मी रोड, टिळक रोड आणि कर्वे रोड हे प्रमुख रस्ते बस वाहतुकीसाठी बंद राहतील. त्यामुळे या मार्गांवरून धावणाऱ्या बसेसचे संचालन पुढीलप्रमाणे करण्यात आलेल्या तात्पुरत्या बसस्थानकांवरून केले जाईल
शाहू महाराज बसस्थानक (स्वारगेट): सातारा रोडने कात्रज, कोंढवा, अप्पर, आणि मार्केटयार्डकडे जाणाऱ्या बसेस आता लक्ष्मी नारायण चौक येथून सुटतील.https://maharashtramirror.com/ Pune News
नटराज बसस्थानक: सिंहगड रोडकडे जाणाऱ्या बसेसचे संचालन पर्वती पायथा (स्वामी समर्थ मठ) बस थांब्यावरून होईल.
स्वारगेट स्थानकाबाहेर: सोलापूर रोडने पुलगेट, हडपसर तसेच भवानी पेठ, नाना पेठ व रास्ता पेठकडे जाणाऱ्या बसेस वेगा सेंटर (स्वारगेट डेपो जवळ) येथून सुटतील.
डेक्कन जिमखाना बसस्थानक: कोथरूड डेपो, माळवाडी आणि एनडीए गेटकडे जाणाऱ्या बसेस एस.एन.डी.टी. कॉलेज जवळून उपलब्ध होतील.
पीएमपीएमएल कडून चीफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन) यांनी प्रवाशांना शुक्रवारी (दि.२५) प्रवास करताना या बदलांची नोंद घेण्याचे आणि बस वाहतुकीतील या तात्पुरत्या बदलांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Share