Skip to content

Pune News : दसरा सणादरम्यान वाहन नोंदणीत घट; मात्र ई-वाहनांची (ईव्ही) मागणी वाढली

Pune News :पुणे - दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर यंदा नव्याने खरेदी केल्या जाणाऱ्या वाहनांच्या नोंदणीत गेल्या वर्षाच्या तुलनेत घट झाल्याचे समोर आले आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

दसरा सणादरम्यान वाहन नोंदणीत घट; मात्र ई-वाहनांची (ईव्ही) मागणी वाढली
दसरा सणादरम्यान वाहन नोंदणीत घट; मात्र ई-वाहनांची (ईव्ही) मागणी वाढली

Pune News :पुणे - दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर यंदा नव्याने खरेदी केल्या जाणाऱ्या वाहनांच्या नोंदणीत गेल्या वर्षाच्या तुलनेत घट झाल्याचे समोर आले आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) आकडेवारीनुसार, एकूण वाहन नोंदणीत घट झाली असली, तरी पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांच्या (इव्ही) नोंदणीत मात्र वाढ नोंदवली गेली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

एकूण वाहन नोंदणीत २५.६ टक्क्यांची घट

मिळालेल्या माहितीनुसार, २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत एकूण १४,१६८ नवीन वाहनांची नोंदणी झाली होती. मात्र, १० ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ही संख्या घसरून १०,५३४ वर आली आहे. म्हणजेच एकूण वाहन खरेदीमध्ये ३,६३४ वाहनांची (सुमारे २५.६५%) घट झाली आहे.

दुचाकी व चारचाकी: दुचाकींची (मोटार सायकल) नोंदणी ८,००७ वरून ७,०४६ वर आली आहे, तर कारची (मोटार कार) नोंदणी ४,८१३ वरून २,५९५ पर्यंत घसरली आहे.

इतर वाहने: ऑटो रिक्षा (४१), टूरिस्ट टॅक्सी (२२९), मालवाहतूक वाहने (५०७) आणि ट्रॅक्टर (४२) यांच्या नोंदणीतही घट पाहायला मिळाली. तर बस नोंदणी ३३ वरून ३६ वर पोहोचली आहे.

इलेक्ट्रिक वाहनांकडे (EV) नागरिकांचा कल वाढला

एकूण वाहनांच्या संख्येत घट झालेली असताना, इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत मात्र सकारात्मक वाढ झाली आहे.

२०२५ च्या कालावधीत एकूण १,५६६ ई-वाहनांची नोंदणी झाली होती. २०२६ च्या याच काळात ई-वाहनांची संख्या वाढून १,६३८ झाली आहे (सुमारे ४.६% वाढ).
यामध्ये विशेषतः ई-बाईक्स (१,१८२) आणि ई-कार (३८२) यांच्या खरेदीला ग्राहकांनी अधिक पसंती दिल्याचे दिसते. इंधनाचे वाढते दर आणि पर्यावरण जागृतीमुळे नागरिक हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Share