Skip to content

Pune News : दिवाळीसाठी पुण्यातून ६०० हून अधिक विशेष एसटी बस

Pune News :पुणे: दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागाने विशेष वाहतुकीचे नियोजन केले आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

दिवाळीसाठी पुण्यातून ६०० हून अधिक विशेष एसटी बस
दिवाळीसाठी पुण्यातून ६०० हून अधिक विशेष एसटी बस

Pune News : विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील ८५ हून अधिक नियमित बसचे आरक्षण पूर्ण

Pune News :पुणे: दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागाने विशेष वाहतुकीचे नियोजन केले आहे. त्यानुसार, ४ ते ७ नोव्हेंबरदरम्यान पुणे विभागातून ६०० हून अधिक विशेष बस सोडण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे दिवाळीच्या काळात गावी जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणानिमित्त पुण्यात राहणारे अनेक नागरिक आपल्या मूळ गावी जातात. त्यामुळे या काळात प्रवाशांची मोठी गर्दी होते. परिणामी, एसटीच्या नियमित बससेवेवरही ताण येतो आणि प्रवाशांना प्रवासासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. ही संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी महामंडळाने अतिरिक्त बसचे नियोजन केले आहे.
दरम्यान, पुणे विभागातून विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राकडे जाणाऱ्या ८५ हून अधिक नियमित बसचे आरक्षण पूर्ण झाले आहे. यामध्ये विदर्भाकडे जाणाऱ्या ४०, मराठवाड्याकडे जाणाऱ्या ३५ आणि पश्चिम महाराष्ट्राकडे जाणाऱ्या १० बसचा समावेश आहे. स्वारगेटवरून कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि शिवाजीनगरवरून छत्रपती संभाजीनगर, नाशिक येथे एसटी सोडण्यात येणार आहेत. वाढती मागणी लक्षात घेता, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाकडून अतिरिक्त बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे.

“दिवाळीच्या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये, त्यांना वेळेवर गाड्या उपलब्ध व्हाव्यात आणि प्रवास सुखकर व्हावा, या उद्देशाने विशेष एसटी बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे. संभाव्य गर्दी लक्षात घेऊन प्रवाशांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवास करता यावा, यासाठी महामंडळाकडून नियोजन करण्यात येत आहे.”
अरुण सिया विभाग नियंत्रक पुणे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Share