Skip to content

Pune Crime : धायरीतील ७४ वर्षीय वृद्धेला ४८ लाखांचा गंडा

Pune Crime पुणे: पुण्यात सायबर भामट्यांचा सुळसुळाट वाढला असून, धायरी परिसरातील एका ७४ वर्षीय महिला नागरिकाची ४८ लाख रुपयांची मोठी फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

धायरीतील ७४ वर्षीय वृद्धेला ४८ लाखांचा गंडा 'डिजिटल अरेस्ट'ची दाखवली भीती
धायरीतील ७४ वर्षीय वृद्धेला ४८ लाखांचा गंडा 'डिजिटल अरेस्ट'ची दाखवली भीती

Pune Crime : 'डिजिटल अरेस्ट'ची दाखवली भीती

Pune Crime पुणे: पुण्यात सायबर भामट्यांचा सुळसुळाट वाढला असून, धायरी परिसरातील एका ७४ वर्षीय महिला नागरिकाची ४८ लाख रुपयांची मोठी फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बनावट पोलीस बनून 'मनी लाँड्रिंग' आणि 'अमली पदार्थांच्या तस्करीत' नाव असल्याचा बनाव रचत सायबर चोरट्यांनी या वृद्धेला अटकेची भीती दाखवून ही रक्कम उकळली आहे.https://maharashtramirror.com/ Pune crime

नांदेडसिटी पोलीस ठाण्यात याप्रकरणी नोंदवलेल्या तक्रारीनुसार, २६ ऑगस्ट २०२६ ते ६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ऑनलाइन माध्यमातून हा प्रकार घडला. सायबर गुन्हेगारांनी वृद्धेशी संपर्क साधून आपण उच्च पोलीस अधिकारी असल्याचे भासवले. फिर्यादी यांच्या नावाने मनी लाँड्रिंग आणि ड्रग्जचे अवैध व्यवहार सुरू असल्याचा खोटा दावा आरोपींनी केला. या गंभीर प्रकरणात त्यांना तात्काळ अटक करण्यात येईल अशी भीती दाखवून आरोपींनी त्यांना मानसिक दबावाखाली आणले.https://maharashtramirror.com/ Pune crime

त्यानंतर, "तुमच्या खात्यांची आणि पैशांची पडताळणी करावी लागेल, अन्यथा कायदेशीर कारवाई होईल," असे सांगत आरोपींनी फिर्यादींना वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. अटकेच्या भीतीपोटी वृद्धेने टप्प्याटप्प्याने तब्बल ४८,००,००० रुपये आरोपींच्या खात्यावर पाठवले. नंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी नांदेडसिटी पोलीस ठाण्यात धाव घेतली.https://maharashtramirror.com/ Pune crime

या प्रकरणी अज्ञात मोबाईलधारक आणि बँक खातेधारकांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०८ (२), ३१९ (२), ३१८(४), ३(५) सह माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) कलम ६६ डी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे (गु.र.नं. २९०/२०२६). वरिष्ठ अधिकारी नागरिकांना आवाहन करत आहेत की, कोणत्याही पोलीस किंवा शासकीय यंत्रणेकडून फोनवर अशी अटकेची धमकी देऊन पैसे मागितले जात नाहीत; अशा फोनला बळी पडू नये. पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रसाद राऊत या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Share