Skip to content

Pune News : डेंग्यू-चिकुनगुनिया रोखण्यासाठी २६५ कंत्राटी कर्मचारी तातडीने नियुक्त करा

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : शहरामध्ये डेंग्यू आणि चिकुनगुनियाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून डास नियंत्रणासाठी प्रस्तावित अतिरिक्त २६५ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया महापालिका प्रशासनाने तातडीने पूर्ण करावी, असे कडक निर्देश महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले य

VK
Vikrant Kulkarni

2 min read

डेंग्यू-चिकुनगुनिया रोखण्यासाठी २६५ कंत्राटी कर्मचारी तातडीने नियुक्त करा
डेंग्यू-चिकुनगुनिया रोखण्यासाठी २६५ कंत्राटी कर्मचारी तातडीने नियुक्त करा

Pune News : स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांचे निर्देश; रुग्णसंख्या अधिक असलेल्या भागांत प्राधान्याने तैनातीचे आदेश

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : शहरामध्ये डेंग्यू आणि चिकुनगुनियाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून डास नियंत्रणासाठी प्रस्तावित अतिरिक्त २६५ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया महापालिका प्रशासनाने तातडीने पूर्ण करावी, असे कडक निर्देश महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिले आहेत. ज्या भागांमध्ये रुग्णांची संख्या अधिक आहे, तिथे या मनुष्यबळाला प्राधान्याने तैनात करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. शहर व परिसरात यंदाच्या हंगामात आतापर्यंत डेंग्यूचे १८२ संशयित रुग्ण आढळले असून, त्यापैकी ३९ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच चिकुनगुनियाचे १४ संशयित रुग्ण आढळले असून हे सर्वच्या सर्व अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. विशेषतः ऑगस्ट महिन्यात रुग्णसंख्येत अचानक वाढ झाल्याचे समोर आल्यानंतर भिमाले यांनी महापालिकेच्या आरोग्य व डास नियंत्रण विभागाच्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेतला.https://maharashtramirror.com/ Pune News

प्रशासनाला सुनावले खडे बोल

डास नियंत्रणासाठी महापालिकेने यापूर्वी १५० कायमस्वरूपी पदे भरली आहेत. मात्र, वाढता प्रादुर्भाव पाहता हे मनुष्यबळ अपुरे पडत असल्याने आणखी २६५ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. यावरून प्रशासकीय दिरंगाईवर ताशेरे ओढत भिमाले म्हणाले, "पावसाळा संपत आला तरी हे प्रस्तावित कर्मचारी अद्याप प्रत्यक्ष कामावर उपलब्ध का झाले नाहीत? पावसाळ्यापूर्वीच हे आवश्यक मनुष्यबळ सज्ज ठेवणे अपेक्षित होते. मग नियुक्तीच्या या प्रक्रियेला इतका विलंब का झाला आणि या विलंबाला जबाबदार कोण?" असा थेट सवाल त्यांनी प्रशासनाला विचारला. https://maharashtramirror.com/ Pune News,

दंडात्मक कारवाईनंतरही रुग्णवाढ कशी?

महापालिकेच्या अहवालानुसार, वर्षभरात ज्या ठिकाणी डासांची उत्पत्तीस्थळे आढळली अशा तब्बल १,७०८ मिळकतदारांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, त्यांच्याकडून एकूण २ लाख ६५ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाई करूनही जर डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या रुग्णांचा आलेख वाढताच असेल, तर पालिकेची डास नियंत्रण मोहीम प्रत्यक्षात किती परिणामकारक ठरत आहे, याचा सखोल आढावा घेण्याची गरज असल्याचे भिमाले यांनी नमूद केले. https://maharashtramirror.com/ Pune News

विशेष मोहिमेचे आदेश
शहरातील ज्या भागात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत, ते भाग 'हॉटस्पॉट' म्हणून घोषित करावे. :हॉटस्पॉट परिसरामध्ये सर्वेक्षण करून डासांची उत्पत्तीस्थळे तात्काळ नष्ट करावीत. डासनाशक औषध फवारणी आणि धूर फवारणीची विशेष मोहीम युद्धापातळीवर राबवावी.
संपूर्ण मोहिमेची अंमलबजावणी योग्य प्रकारे होते की नाही, याचा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रोजच्या रोज आढावा घ्यावा. असे आदेश यावेळी देण्यात आले.

Share