Pune News : पुण्याच्या आरोग्याशी खेळणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर कारवाईची टांगती तलवार
Pune News पुणे : शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असताना, याला आळा घालण्यासाठी पुणे महानगरपालिकेने आता थेट बांधकाम व्यावसायिकांवर आणि कंत्राटदारांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे.
2 min read

Pune News :डेंग्यूचा नवा हॉटस्पॉट ठरणाऱ्या बांधकाम साईट्सवर सर्जिकल स्ट्राईक; नागरिकांचे जिणे हराम करणाऱ्या कंत्राटदारांचे परवाने रद्द करण्याचा प्रशासनाचा इशारा
Pune News पुणे : शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असताना, याला आळा घालण्यासाठी पुणे महानगरपालिकेने आता थेट बांधकाम व्यावसायिकांवर आणि कंत्राटदारांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. महापालिकेच्या पाहणीत अनेक ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामांवर साचलेले पाणी डेंग्यूच्या डासांच्या उत्पत्तीचे प्रमुख कारण बनल्याचे समोर आले आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
शहरात ठिकठिकाणी सुरू असलेल्या उंच इमारती आणि कमर्शियल प्रकल्पांच्या ठिकाणी कामगारांसाठी साठवलेले पाणी, क्युरींगसाठी (स्लॅब ओल्या करण्यासाठी) वापरले जाणारे पाणी तसेच बेसमेंटमध्ये किंवा साहित्याखाली साचून राहिलेले पाणी डेंग्यूच्या अळ्यांच्या (लारव्हा) वाढीसाठी पोषक ठरत आहे. अनेकदा नोटीस देऊनही बांधकाम व्यावसायिक स्वच्छतेबाबत आणि पाण्याचा निचरा करण्याबाबत हलगर्जीपणा दाखवत असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे.
शहरात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असून, १ जानेवारी ते १० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत पुण्यात डेंग्यूच्या १,८२६ रुग्णांची नोंद झाली आहे. विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांत डेंग्यूच्या फैलावात मोठी वाढ झाली असून, केवळ सप्टेंबर महिन्यातच ६६२ रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेली बांधकामे आणि साचणारे पाणी डेंग्यूच्या अत्त्युत्पादनाचे मुख्य केंद्र बनत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, यंदाच्या पावसाळ्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ नोंदवली गेली. जून महिन्यात १०३ असलेले डेंग्यूचे रुग्ण जुलैमध्ये ३६६, ऑगस्टमध्ये ५१२ आणि सप्टेंबरमध्ये थेट ६६२ वर पोहोचले. यापूर्वी २०२४ मध्ये शहरात ५,३४० तर २०२५ मध्ये २,७६४ डेंग्यू रुग्ण आढळले होते. यंदाच्या सप्टेंबर महिन्यातील आकडेवारी गतवर्षीच्या सप्टेंबरच्या तुलनेत सुमारे ९.६ टक्क्यांनी अधिक आहे.कोथरूड, नगर रोड-वडगाव शेरी आणि औंध-बाणेर या परिसरांमध्ये डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण समोर आले आहेत.
६०० हून अधिक साईट्स रडारवर
मनपाचे साहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात ठिकठिकाणी सुरू असलेल्या इमारतींच्या बांधकामांवर साचणारे पाणी डेंग्यूच्या डासांसाठी पोषक ठरत आहे. काँक्रीट स्लॅब क्युरींगसाठी (पाणी मारण्यासाठी) वापरले जाणारे पाणी, इमारतींचे कोपरे, तळघरे तसेच साहित्याखाली साचून राहिलेले पाणी यामुळे कामगार आणि परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासमोर मोठा धोका निर्माण झाला आहे. महापालिकेच्या नियमांचे पालन न करणाऱ्या आणि डासोत्पत्ती रोखण्यात अपयशी ठरलेल्या ६०० हून अधिक बांधकाम साईट्सची यादी आता बांधकाम विभागाकडे सुपूर्द करण्यात आली असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाईची तयारी सुरू आहे.
स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मनपाच्या आरोग्य पथकांनी जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत तब्बल १३ लाख ९० हजार ५५४ मालमत्तांची पाहणी केली. यादरम्यान १२,९३९ ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या (लारव्हा) आढळल्या. तपासण्यात आलेल्या २८ लाख ३१ हजार ३८६ पाणीसाठ्यांपैकी १८,८८५ कंटेनरमध्ये डासांची निर्मिती होत असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी महापालिकेने २,६५१ जणांना नोटिसा बजावून ५,५७,100 रुपयांचा दंड वसूल केला आहे. याशिवाय प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ८४,७६६ घरांमध्ये धूर फवारणी (फॉगींग) आणि २,५८,२९१ घरांमध्ये रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करण्यात आली आहे.
महानगरपालिकेने नागरिक व कंत्राटदारांना आवाहन केले आहे की, परिसर स्वच्छ ठेवावा, इमारतींच्या छतावर किंवा आजूबाजूला पाणी साचू देऊ नये, पाण्याचे भांडे झाकून ठेवावेत आणि ड्रेनेजची नियमित स्वच्छता करावी. तीव्र डोकेदुखी, उच्च ताप, डोळ्यांच्या मागे दुःखी होणे, सांधे किंवा स्नायूंमध्ये वेदना, अंगावर पुरळ उठणे यांसारखी लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा। तसेच पोटात तीव्र दुखणे, सतत उलट्या होणे, अशक्तपणा किंवा अस्वाभाविक पंगूळपणा जाणवल्यास तातडीने रुग्णालयात दाखल होण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.


