Skip to content

Pune News : वर्क फ्रॉम होमच्या आमिषाने साडेआठ लाखांची फसवणूक

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : घरातून काम करण्याचे आमिष दाखवून कोथरूडमधील ४२ वर्षीय महिलेची ८ लाख ५४ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

वर्क फ्रॉम होमच्या आमिषाने साडेआठ लाखांची फसवणूक
वर्क फ्रॉम होमच्या आमिषाने साडेआठ लाखांची फसवणूक

Pune News : कोथरूडमधील महिलेची वारजे माळवाडी पोलिसांत तक्रार

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : घरातून काम करण्याचे आमिष दाखवून कोथरूडमधील ४२ वर्षीय महिलेची ८ लाख ५४ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. हा प्रकार ७ ते १३ ऑगस्टदरम्यान ऑनलाइन माध्यमातून घडला.https://maharashtramirror.com/ Pune News

फिर्यादीनुसार, अनोळखी टेलिग्राम आयडीधारकाने महिलेला ‘वर्क फ्रॉम होम’ करण्यास सांगून एका टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. त्यानंतर पेड टास्कसाठी पाठवलेल्या लिंकद्वारे खाते उघडण्यास सांगितले. https://maharashtramirror.com/ Pune News

त्या खात्यात सुरुवातीला किरकोळ रकमेचा परतावा दाखवून महिलेचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर तिची एकूण ८ लाख ५४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी टेलिग्राम आयडीधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अद्याप अटक झालेली नाही.या प्रकरणी पोलिस निरीक्षक (गुन्हे) सुवर्णा हुलवान पुढील तपास करीत आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Share