Pune Crime : मुलीच्या नावाने बनावट स्नॅपचॅट करणार अटकेत; तरूणाला दीड लाखांचा गंडा
Pune Crime पिंपरी, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : स्नॅपचॅटवर ‘प्रिन्सिका जोशी’ नावाच्या मुलीचे बनावट प्रोफाईल तयार करून आणि मुलीच्याच आवाजात फोनवर बोलून एका तरुणाची दीड लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका उच्चशिक्षित तरूणाला पुणे शहराच्या सायबर पोलिसांनी अटक केली.
1 min read

Pune Crime : पुणे शहर सायबर पोलिसांची कारवाई
Pune Crime पिंपरी, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : स्नॅपचॅटवर ‘प्रिन्सिका जोशी’ नावाच्या मुलीचे बनावट प्रोफाईल तयार करून आणि मुलीच्याच आवाजात फोनवर बोलून एका तरुणाची दीड लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका उच्चशिक्षित तरूणाला पुणे शहराच्या सायबर पोलिसांनी अटक केली. कुणाल जितेंद्र अदमाने (वय २५, रा. पर्वती परिसर, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.https://maharashtramirror.com/ Pune Crime
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणाला स्नॅपचॅटवर ‘प्रिन्सिका जोशी’ नावाच्या अकाऊंटवरून फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर दोघांमध्ये संवाद सुरू झाला. आरोपी कुणालने हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले असून, त्याने स्वतःची ओळख लपवून तब्बल सहा ते सात महिने मुलीच्या आवाजात फोनवर बोलून तरुणाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर “क्रिप्टोकरन्सीमध्ये (Cryptocurrency) गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक फायदा व आकर्षक परतावा मिळेल,” असे आमिष त्याने दाखवले. या आमिषाला बळी पडून तक्रारदाराने स्वतःच्या क्रिप्टो वॉलेटमधून आरोपीच्या क्रिप्टो वॉलेटवर १४६८ USDT अंदाचे एक लाख ५० हजार रुपये ट्रान्सफर केले. मात्र, काही दिवसांनी परताव्याबाबत विचारणा सुरू करताच आरोपीने स्नॅपचॅट आणिइंस्टाग्राम अकाऊंट बंद करून संपर्क तोडला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरूणाने पोलिसांत धाव घेतली. सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे वरिल आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीने चौकशीदरम्यान गुन्ह्याची कबुली दिली.ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांच्यासह पथकाने केली आहे.https://maharashtramirror.com/ Pune crime
सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती ठेवू नये
सोशल मीडियावर फोटो, नाव किंवा आवाजावर सहज विश्वास ठेवू नका.
कमी कालावधीत क्रिप्टो किंवा इतर गुंतवणुकीत मोठ्या परताव्याचे अमिष दाखवणाऱ्यांपासून दूर राहा.
फसवणूक झाल्यास तात्काळ चॅट, मोबाईल नंबर व ट्रान्सफर डिटेल्ससह सायबर पोलिसांशी संपर्क साधा, असे आवाहन सायबर पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे.


