Pune News : स्वच्छता आणि नशामुक्तीचा संदेश देण्यासाठी पुण्यात जनजागृती रथ
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : स्वच्छतेबरोबरच तरुणांमध्ये अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्यासाठी पुणे कस्टम्सच्या वतीने ‘स्वच्छता रथ’ आणि ‘नशामुक्त भारत अभियान रथ’ सुरू करण्यात आले आहेत.
1 min read

Pune News : पुणे कस्टम्सचा उपक्रम; शहरातील प्रमुख ठिकाणी दहा दिवस फिरणार इलेक्ट्रिक वाहने
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : स्वच्छतेबरोबरच तरुणांमध्ये अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्यासाठी पुणे कस्टम्सच्या वतीने ‘स्वच्छता रथ’ आणि ‘नशामुक्त भारत अभियान रथ’ सुरू करण्यात आले आहेत. पुण्यातील ससून रोड येथील जीएसटी भवन परिसरातून बुधवारी (दि. १६) या जनजागृती रथांना पुणे झोनचे मुख्य आयुक्त नीरज कंसल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला.https://maharashtramirror.com/ pune News
पुणे कस्टम्सचे प्रधान आयुक्त डी. अनिल यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष जनजागृती उपक्रमाची संकल्पना राबविण्यात आली आहे. सामाजिक जबाबदारी आणि नागरिकांपर्यंत स्वच्छता तसेच नशामुक्तीचा संदेश पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ pune news
या अभियानासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्यात येत आहे. वाहनांवर ‘विकसित भारतासाठी नशामुक्त युवा अभियान’ आणि ‘स्वच्छता ही सेवा’ या विषयांवरील जनजागृतीपर संदेश प्रदर्शित करण्यात आले आहेत. हे रथ पुणे शहरातील विविध भागांत फिरणार असून रेल्वे स्थानके, शाळा, महाविद्यालये आणि गणेश मंडळांसह नागरिकांची मोठी गर्दी असलेल्या प्रमुख ठिकाणी ते थांबणार आहेत.
प्लास्टिकमुक्त भारत, कचऱ्याचे वर्गीकरण आणि सार्वजनिक स्वच्छतेबाबत नागरिकांना या माध्यमातून माहिती दिली जाणार आहे. ‘प्लास्टिकमुक्त भारत निर्माण करूया’, ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ यासह स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारे संदेश रथांवर देण्यात आले आहेत.
अमली पदार्थांच्या व्यसनापासून विशेषतः तरुणांनी दूर राहावे, यासाठीही अभियानात भर देण्यात आला आहे. ‘जीवनाला हो म्हणा, ड्रग्जला नाही म्हणा’ अशा संदेशांच्या माध्यमातून नशामुक्तीबाबत नागरिकांमध्ये जागृती केली जाणार आहे.
पुढील दहा दिवस ‘स्वच्छता रथ’ आणि ‘नशामुक्त भारत अभियान रथ’ पुणे शहरातील प्रमुख सार्वजनिक ठिकाणी फिरणार आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून लाखो नागरिकांपर्यंत स्वच्छता, प्लास्टिकमुक्ती आणि अमली पदार्थमुक्त समाजाचा संदेश पोहोचविण्याचा पुणे कस्टम्सचा प्रयत्न आहे.


