Skip to content

Mumbai News : 'क्रूड ऑईलमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; दुबईला पळण्याच्या तयारीत असलेल्या भामट्याला मुंबई विमानतळावर ठोकल्या बेड्या!'

Mumbai News :मुंबई :- जास्त नफा देण्याचे आमिष दाखवून नागरिकांना लुबाडणाऱ्या सायबर भामट्यांचा आणि आर्थिक गुन्हेगारांचा उपद्रव वाढला आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

'क्रूड ऑईलमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; दुबईला पळण्याच्या तयारीत असलेल्या भामट्याला मुंबई विमानतळावर ठोकल्या बेड्या!'
'क्रूड ऑईलमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; दुबईला पळण्याच्या तयारीत असलेल्या भामट्याला मुंबई विमानतळावर ठोकल्या बेड्या!'

Mumbai News :'दरमहा 5 ते 10 टक्के परताव्याचे दिले होते आमिष; पुण्यातील 10 जणांची तब्बल 2.74 कोटींची फसवणूक, कोंढवा पोलिसांची धडक कारवाई'

Mumbai News :मुंबई :- जास्त नफा देण्याचे आमिष दाखवून नागरिकांना लुबाडणाऱ्या सायबर भामट्यांचा आणि आर्थिक गुन्हेगारांचा उपद्रव वाढला आहे. पुण्यातून असाच एक मोठा आर्थिक फसवणुकीचा प्रकार समोर आला असून, क्रूड ऑईलच्या (Crude Oil) आयात-निर्यातीतून मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून तब्बल 2 कोटी 74 लाख 94 हजार 882 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. आरोपीने दरमहा 5 ते 10 टक्के परतावा आणि एका वर्षानंतर गुंतवलेली संपूर्ण मूळ रक्कम परत करण्याचे गाजर दाखवून अनेक गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये उकळले होते.https://maharashtramirror.com/ Mumbai News

दुबईला पळून जाण्याचा प्रयत्न निष्फळ; मुंबई विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी आवळल्या मुसक्या

याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी मुख्य आरोपी साजिद अनिफ नवडेकर (वय 45) याच्याविरोधात लुकआउट सर्क्युलर (Lookout Circular) जारी केले होते. गुरुवारी आरोपी साजिद नवडेकर हा कायदेशीर कारवाईपासून वाचण्यासाठी दुबईला पळून जाण्याच्या तयारीत असताना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचला. मात्र, तेथील इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी लुकआउट नोटीसच्या आधारे त्याला तत्काळ अडवले आणि कोंढवा पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणात साजिदसह गोहर उर्फ इमान अंगोलकर, फराहदिबा अंगोलकर आणि शाहिद अनिफ नवडेकर यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

NIBM रोडवरील व्यावसायिकाची तक्रार; 10 जणांना घातला टोपी

पुण्यातील NIBM रोडवर ऑइल-रिसायकलिंग कंपनी चालवणाऱ्या एका व्यावसायिकाने यासंदर्भात तक्रार नोंदवली आहे. ऑगस्ट ते डिसेंबर 2023 या कालावधीत तक्रारदारासह 10 जणांनी आरोपीच्या योजनेत तब्बल 4 कोटी 9 लाख 94 हजार 882 रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यापैकी आरोपींनी केवळ 1 कोटी 35 लाख रुपये परत केले. मात्र, उर्वरित 2 कोटी 74 लाख 94 हजार 882 रुपये देण्यास टाळाटाळ करत फोन आणि मेसेजला प्रतिसाद देणे बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बाधितांनी पोलिसांत धाव घेतली. सध्या कोंढवा पोलीस या आंतरराष्ट्रीय धागेदोर असलेल्या आर्थिक घोटाळ्याचा सखोल तपास करत आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Share