Skip to content

Pune News : पुण्यातील पंचतारांकित हॉटेलवर वेश्याव्यवसायाच्या संशयातून पोलिसांचा छापा

Pune News :पुणे: चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम मिळवून देण्याच्या आमिषातून कास्टिंग काऊचचा प्रकार घडत आहे का, असा प्रश्न उपस्थित करणारी घटना पुण्यात समोर आली आहे.

VK
Vikrant Kulkarni

2 min read

पुण्यातील पंचतारांकित हॉटेलवर वेश्याव्यवसायाचा संशयातून पोलिसांचा छापा
पुण्यातील पंचतारांकित हॉटेलवर वेश्याव्यवसायाचा संशयातून पोलिसांचा छापा

Pune News : ग्लॅमरच्या दुनियेत काम मिळवून देण्याच्या आमिषातून कास्टिंग काऊचचा प्रकार

Pune News :पुणे: चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम मिळवून देण्याच्या आमिषातून कास्टिंग काऊचचा प्रकार घडत आहे का, असा प्रश्न उपस्थित करणारी घटना पुण्यात समोर आली आहे. संगमवाडी परिसरातील पंचतारांकित हॉटेल क्राऊन प्लाझामध्ये एजंटच्या माध्यमातून आणलेल्या दोन महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक कक्षाने हॉटेलवर छापा टाकून दोन परराज्यातील महिलांची सुटका केली. या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ ऑक्टोबर रोजी गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक कक्षाला हॉटेल क्राऊन प्लाझा, पुणे सिटी सेंटर, एक्साईज कॉलनीजवळ, संगमवाडी, बंडगार्डन रोड येथे एजंटच्या माध्यमातून महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने या माहितीची पडताळणी केली. बनावट ग्राहकाच्या मदतीने माहितीची खात्री केल्यानंतर हॉटेलवर अचानक छापा टाकण्यात आला. यावेळी वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या मॉडेलिंग क्षेत्रात काम करणाऱ्या दोन परराज्यातील महिलांची सुटका करण्यात आली.

या प्रकरणी रोहन ऊर्फ राजकुमार (वय ३२, रा. आसाम), विवेक ऊर्फ मयंक कबीर (वय ३४, रा. आसाम), विक्रम ऊर्फ पियुष (वय ३४, रा. आसाम) आणि त्यांच्या अन्य एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २६ ऑक्टोबर रोजी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १७६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम १४३(१), १४३(३), ३(५) तसेच अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ च्या कलम ४ आणि ५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त, गुन्हे, गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे-३, शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक आशालता खापरे, सहायक पोलीस निरीक्षक सोनाली जगदाळे आणि साठे, तसेच पोलीस अंमलदार ईश्वर आंधळे, बबनराव केदार, अमेय रसाळ, अविनाश कोंडे, किशोर भुजबळ, सुरेखा आंधळे, मनिषा वायसे, फराह पठाण, वैशाली खेडेकर आणि वैशाली इंगळे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

दरम्यान, या महिलांना चित्रपट किंवा टीव्ही मालिकांमध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते का, तसेच या प्रकरणाचा कास्टिंग काऊचशी काही संबंध आहे का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाच्या पुढील तपासातून काय उघड होते, याकडे लक्ष लागले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Share