Skip to content

Pune Crime News : पुण्यात पोलिसांचा ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन’!शस्त्राचा धाक दाखवून मोबाईल चोरणारे 4 अट्टल गुन्हेगार 12 तासांत गजाआड

•कोरेगाव पार्क पोलिसांची धडक कारवाई, 1.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करत 4 गुन्हे उघडकीस

V
Vivek

1 min read

Pune Crime News : पुण्यात पोलिसांचा ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन’!शस्त्राचा धाक दाखवून मोबाईल चोरणारे 4 अट्टल गुन्हेगार 12 तासांत गजाआड

•कोरेगाव पार्क पोलिसांची धडक कारवाई, 1.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करत 4 गुन्हे उघडकीस

पुणे :- पुणे शहरात वाहनचोरी आणि धाकदपटशाने मोबाईल हिसकावून घेण्याचे प्रकार वाढले असताना, कोरेगाव पार्क पोलिसांनी अवघ्या 12 तासांत 4 अट्टल चोरांना जेरबंद करत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 1 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, 4 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सूचनेनुसार, पुणे शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. याच मोहिमेअंतर्गत कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याचा तपास सुरू असताना, तपास पथकाला गुप्त बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे, पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तत्काळ कारवाई करत, सिद्धार्थ उमेश मोरे (19 वय), कृष्णा उर्फ विकी टिमरेड्डी धनगर (21 वय ), आर्यन संभाजी वाघमारे (19 वय) आणि एका विधीसंघर्षित बालकाला क्वीन्स गार्डन रेल्वे पटरीच्या बाजूला संशयास्पद स्थितीतून ताब्यात घेतले. पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाही, पोलिसांनी पाठलाग करून त्यांना शिताफीने पकडले.

सखोल चौकशीअंती आरोपींनी गुन्हे कबूल केले. त्यांच्याकडून 4 मोबाईल, एक सुझुकी कंपनीची बर्गमन मोपेड दुचाकी, एक धारदार शस्त्र आणि तीनशे रुपये रोख रक्कम असा एकूण 1 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमधील 3 आणि वानवडी पोलीस स्टेशनमधील 1 असे एकूण 4 गुन्हे या कारवाईमुळे उघडकीस आले आहेत.

मा. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र बनसोडे, पोलीस उप आयुक्त मिलींद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस आयुक्त अतुल नवगिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगीता जाधव यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक श्रीकांत चव्हाण आणि त्यांच्या पथकाने ही प्रशंसनीय कामगिरी केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक श्रीकांत चव्हाण करत आहेत.

हेही वाचा: Mumbai Crime News : रिक्षातून प्रवास करणाऱ्या तरुणीचा मोबाईल हिसकावणारा अखेर सापडला!

Share