Skip to content

Pune Crime News : कोंढवा हादरलं! डिलिव्हरी बॉय बनून घरात घुसला आणि…

Pune Latest Crime News : 25 वर्षीय तरुणीवर बलात्कार; आरोपीने पीडितेसोबत काढला सेल्फी,तोंडावर स्प्रे मारून अत्याचार

V
Vivek

1 min read

Pune sexual assault case, Kondhwa crime news, courier boy assault Pune, woman attacked in apartment, Pune techie assault, Kondhwa police investigation, fake courier delivery crime, Pune woman safety issue, Maharashtra assault cases

Pune Latest Crime News : 25 वर्षीय तरुणीवर बलात्कार; आरोपीने पीडितेसोबत काढला सेल्फी,तोंडावर स्प्रे मारून अत्याचार

पुणे | पुण्यातील कोंढवा परिसरात बुधवारी रात्री एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या 25 वर्षीय तरुणीवर डिलिव्हरी बॉयच्या वेशात आलेल्या नराधमाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पुणे शहर हादरले असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. Pune Latest Crime News

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडेसातच्या सुमारास आरोपी तरुणाने डिलिव्हरी बॉय असल्याचे भासवून सोसायटीत प्रवेश केला. तो पीडित तरुणीच्या घरी जाऊन ‘कुरिअर आलं आहे’ असं सांगू लागला. पीडितेने स्पष्ट केल्यानंतरही "सही करावी लागेल" असा दबाव टाकताच तिने सेफ्टी डोअर उघडले. त्या क्षणीच आरोपीने तिच्या तोंडावर स्प्रे फवारला आणि बेशुद्ध अवस्थेत लैंगिक अत्याचार केला.

घटनेनंतर आरोपीने पीडितेच्या मोबाईल फोनवर सेल्फी काढला आणि "परत येईल" असा मजकूर टाईप करून ठेवला. या अमानवी कृत्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे.

कोंढवा पोलिसांनी Kondhwa Police Station या घटनेची गंभीर दखल घेत आरोपीचा शोध घेण्यासाठी 5 विशेष पथके तातडीने रवाना केली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे.

Share