Pune Crime News | काळेपडळ परिसरात घरफोड्या करणारे पापडेवस्ती येथील दोघे जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त
पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : Pune Crime News | काळेपडळ परिसरात घरफोड्या करून लॅपटॉप, मोबाईल फोन, स्मार्ट वॉच, डेटा केबल आणि स्पीकर चोरणाऱ्या दोघांना काळेपडळ पोलिसांनी अटक केली.
1 min read

३.७० लाखांचे दोन लॅपटॉप, तीन मोबाईल, स्मार्ट वॉचसह मुद्देमाल जप्त; सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा शोध | Pune Crime News
पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : Pune Crime News | काळेपडळ परिसरात घरफोड्या करून लॅपटॉप, मोबाईल फोन, स्मार्ट वॉच, डेटा केबल आणि स्पीकर चोरणाऱ्या दोघांना काळेपडळ पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून दोन घरफोड्यांतील सुमारे ३ लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. Pune Police
काळेपडळ पोलिस ठाण्यात दाखल घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तपास पथकाचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक अमित शेटे आणि पथकातील पोलिस अंमलदार विशाल ठोंबरे व नितीन ढोले यांना मिळालेल्या माहितीनुसार, दोन संशयित लॅपटॉप विक्रीसाठी हांडेवाडी रोड परिसरातील जैन टाउनशिपजवळ येणार असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. Pune Crime News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य प्रभाकर मांदळे (वय १९, रा. मोगाजी कॉलनी, गणेश हाईट्स, ग्राउंड फ्लोअर, पापडेवस्ती, हडपसर) आणि प्रथमेश उमेश भडकवाड (वय १९, रा. मोजाजी कॉलनी, गणेश हाईट्स, ग्राउंड फ्लोअर, पापडेवस्ती, हडपसर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडे चौकशी केली असता घरफोडीत चोरी केलेले लॅपटॉप तातडीने विकण्यासाठी ते आल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. Pune crime news
या कारवाईत पोलिसांनी एका गुन्ह्यातील १ लाख २० हजार रुपये किमतीचा लिनोवो कंपनीचा लॅपटॉप, तर दुसऱ्या गुन्ह्यातील २ लाख ५० हजार रुपये किमतीचा एचपी कंपनीचा लॅपटॉप, दोन मोबाईल फोन, दोन स्मार्ट वॉच, हेडफोन, साउंडबार, ब्लूटूथ स्पीकर, डेटा केबल आणि अन्य साहित्य जप्त केले. अशा प्रकारे दोन घरफोड्यांतील एकूण ३ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. Maharashtra Mirror
आरोपींकडे अधिक चौकशी सुरू असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ही कारवाई अतुल कुमार नवगिरे, सहायक पोलिस आयुक्त हडपसर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांच्या सूचनेनुसार सहायक पोलिस निरीक्षक अमित शेटे आणि काळेपडळ पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने केली.


