Skip to content

Pune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची मोठी कारवाई: २.८५ लाखांचा बेकायदेशीर हुक्का फ्लेवर जप्त

पुणे, महाराष्ट्र मिरर

M
Mubarak

2 min read

Pune Crime News
Pune Crime News illegal hookah flavor seized

Pune Crime News : भवानी पेठ आणि कोंढव्यातील दोन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात; पत्र्याच्या शेडमधून साठ्याची विक्री

पुणे, महाराष्ट्र मिरर

Pune Crime News : पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ने कौसरबाग, कोंढवा परिसरात बुधवारी (१ जुलै) रात्री एक मोठी कारवाई केली. एका पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीररित्या विक्रीसाठी लपवून ठेवलेला तब्बल २ लाख ८५ हजार ४१० रुपयांचा विविध कंपन्यांचा तंबाखूजन्य हुक्का फ्लेवरचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी दोन जणांना जाळ्यात ओढण्यात पोलिसांना यश आले आहे. (Pune Crime News illegal hookah flavor seized )

लतीफ शेख आणि नवाज पठाण पोलिसांच्या ताब्यात
या धडक कारवाईत पोलिसांनी १) लतीफ लाल शेख (वय ६२, रा. ८२४, भवानी पेठ, पुणे) आणि २) नवाज अरमानखान पठाण (वय २६, रा. भाग्योदयनगर, इस्लाम बेकरी शेजारी, कोंढवा, पुणे) अशा दोन इसमांना अटक केली आहे. हे दोघेही वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांच्या अवैद्य तंबाखूजन्य हुक्का फ्लेवरचा मोठा साठा जवळ बाळगून त्याची गुपचूप विक्री करत होते. (Pune Crime News )

Crime News : दौंडमध्ये धाडसी घरफोडी; ३.८७ लाखांचा ऐवज लंपास

अशी झाली कारवाई…

दिनांक १ जुलै रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक-१ च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती तृप्ती सोनवणे आणि त्यांचे पथक पुणे शहर परिसरात नेहमीप्रमाणे गस्त घालत होते. गस्तीदरम्यान पोलीस अंमलदार मंगेश गुंड यांना त्यांच्या विश्वासू बातमीदारामार्फत एक महत्त्वपूर्ण माहिती मिळाली.

https://www.instagram.com/p/DaUfzxps_dh

कोंढव्यातील कौसरबाग येथील 'अर्बन बाईट्स हॉटेल'च्या पाठीमागे असलेल्या 'मदिना डेली नीड्स शॉप'च्या पत्र्याच्या शेडमध्ये हुक्का फ्लेवरचा मोठा बेकायदेशीर साठा साठवून ठेवण्यात आला असून, तिथून त्याची विक्री केली जात असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. (Pune Crime News )

हेही वाचा: Sting Drink Ban: शाळांच्या ५०० मीटर परिसरात 'स्टिंग' ड्रिंकच्या विक्रीवर बंदी

माहिती मिळताच पथकाने वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास (२०:३० वा.) सदर ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात पोलिसांना वेगवेगळ्या गोण्या आणि बॉक्समध्ये भरलेला प्रतिबंधित तंबाखूजन्य हुक्का फ्लेवरचा साठा आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण २,८५,४१० रुपये किमतीचा माल जप्त करत दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या.

Ashadhi Wari 2026: पालखी सोहळ्यासाठी पुणे महापालिका सज्ज; यंदाची ‘सेवा वारी’

पुणे शहरात अंमली पदार्थ आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीविरुद्ध कडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. ही यशस्वी कामगिरी अंमली पदार्थ विरोधी पथक-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती तृप्ती सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस उपनिरीक्षक योगेश कोतकर तसेच पोलीस अंमलदार आशा भिंगारे, संजय राजे, अमोल सरडे, निलेश जाधव, विजय कांबळे, अतुल क्षिरसागर, सचिन लोहार, निशिकांत सावंत, तुषार साळुंके, जानव्ही सुर्यवंशी आणि बातमीदारामार्फत अचूक माहिती काढणारे मंगेश गुंड यांच्या पथकाने केली आहे. पुणे शहर पोलिसांकडून या बेकायदेशीर हुक्का फ्लेवरच्या पुरवठ्याची साखळी कुठपर्यंत पसरली आहे, याबाबतचा पुढील तपास सुरू आहे. (Pune Crime News )

Share