Skip to content

Pune Crime : पुणे शहर विविध गुन्ह्यांनी हादरले

Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर: सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात गुन्हेगारीच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत.

VK
Vikrant Kulkarni

2 min read

Mumbai Crime News

Pune Crime : सायबर फसवणूक, घरफोडी, अपघात अन्‌ कौटुंबिक छळाप्रकरणी गुन्हे दाखल

Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर: सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात गुन्हेगारीच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. ऑनलाईन गंडा घालणाऱ्या भामट्यांनी ‘डिजिटल अरेस्ट’ आणि गुंतवणुकीच्या नावाखाली पुणेकरांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. तर दुसरीकडे, तसेच अपघात, घरफोडी आणि कौटुंबिक छळाला कंटाळून विवाहितेने उचललेले टोकाचे पाऊल, अशा विविध गंभीर घटनांनी शहर हादरले आहे. या सर्व गुन्ह्यांची पोलिस प्रशासनाकडून चौकशी करण्यात येत असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येत आहे.https://maharashtramirror.com/ Pune crime

सायबर फसवणुकीत तीन कोटींची लूट

हडपसर येथील ७४ वर्षीय वृद्धाला भामट्याने फोन करून आपण ‘सीबीआय अधिकारी’ असल्याचे भासवले. आधार कार्डचा वापर मनी लाँड्रिंगमध्ये झाल्याची भीती दाखवून, अटकेची धमकी देत वृद्धाकडून १ कोटी २८ लाख रुपये विविध बँक खात्यांवर ट्रान्सफर करून घेतले.याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे तपास करत आहेत.https://maharashtramirror.com/ Pune Crime

आंबेगाव खुर्द येथे ‘रेडिओ ॲक्टिव्ह पॉवर’ (RP) वस्तू ॲक्टिव्हेट करून ती विकल्यास शंभर कोटींपेक्षा जास्त पैसे मिळतील असे आमिष दाखवून एका व्यक्तीची दोन कोटी ८० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिस उपनिरिक्षक युवराज शिंदे तपास करत आहेत.https://maharashtramirror.com/ Pune crime

हडपसर येथील ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला शेअर ट्रेडिंगमध्ये चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून ७ लाख ३ हजार ९०० रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.पोलिस निरीक्षक निलेश जगदाळे तपास करत आहेत. https://maharashtramirror.com/ Pune crime

अपघातात दोघांचा मृत्यू

हडपसरमधील काळेपडळ येथील जेएसपीएम कॉलेजजवळ भरधाव कचऱ्याच्या ट्रकने दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात धर्मराज राजाराम जैस्वार (वय ४४) त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी चालक विवेक मोरे याच्याविरोधात काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. https://maharashtramirror.com/ Pune crime

खराडी जकात नाक्याजवळ पाऊस आणि ओलसर रस्त्यामुळे हरिश्चंद्र कुंडलीक गायकवाड (वय ४३) यांची दुचाकी घसरली. त्याचवेळी मागून आलेल्या भरधाव दुचाकी त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.https://maharashtramirror.com/ Pune crime

बेकरी फोडून ९२ हजारांचा ऐवज लंपास

वानवडीतील आझादनगर येथील ‘फूड प्लाझा बेकरी’चे शटर उचकटून चोरट्याने ९० हजार रुपयांची रोकड व मोबाईल असा एकूण ९२ हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिस उप.िनरीक्षक शिंदे तपास करत आहेत.

विवाहितेची आत्महत्या

लग्नात मानपान केला नाही, तसेच एक एकर जमीन व पैशांची मागणी करत सासरच्यांनी केलेल्या मानसिक छळाला ृकंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना वारजे माळीवाडी येथे घडली. प्रीती विलास तरगुडे (वय २८) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिस उप.िनरिक्षक प्रियंका निकम तपास करत आहेत.

Share