Pune Crime : कारचालकाला गाडी बाजूला घेण्याच्या वादातून मारहाण
Pune Crime पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : नवले पूल नऱ्हे परिरसरातील सर्व्हिस रोडवर वाहतूक कोंडीदरम्यान गाडी बाजूला न घेतल्याच्या कारणावरून चार अज्ञातांनी एका कारचालकाला आणि त्याच्या चुलत्यांना बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
1 min read

Pune Crime : नऱ्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Pune Crime पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : नवले पूल नऱ्हे परिरसरातील सर्व्हिस रोडवर वाहतूक कोंडीदरम्यान गाडी बाजूला न घेतल्याच्या कारणावरून चार अज्ञातांनी एका कारचालकाला आणि त्याच्या चुलत्यांना बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीदरम्यान त्यांनी कारची तोडफोड करत फिर्यादीच्या गळ्यातील १ लाख ५० हजार रुपयांची सोन्याची साखळी हिसकावून पोबारा केला. याप्रकरणी नऱ्हे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.https://maharashtramirror.com/ Pune Crime
वाकड येथील रहिवासी असलेला ३२ वर्षीय तरुण रविवारी (दि.३०) रात्री सुमारे अकरा वाजेच्या सुमारास कारमधून नवले पूल (नऱ्हे) हद्दीतील स्वामी नारायण मंदिर ते भूमकर चौकाकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवरून जात होते. रस्त्यावर वाहतूक कोंडी असल्यामुळे गाड्या हळूहळू पुढे सरकत होत्या.https://maharashtramirror.com/ Pune Crime
त्याच वेळी दोन मोपेड गाड्यांवरून आलेल्या चार अज्ञात व्यक्तींनी फिर्यादीला “चारचाकी गाडी बाजूला का घेतली नाही?” असा जाब विचारत अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्याने मोपेडवरील चौघांनी कारचालकाला आणि गाडीमध्ये असलेल्या त्यांच्या चुलत्याला बेदम मारहाण केली. तसेच, कारचेही मोठे नुकसान करत त्यांच्या गळ्यातील दीड लाख रूपये किमतीची सोन्याची चेन हिसकावून घेत त्यांनी पोबारा केला. या घटनेनंतर संबंधित तरूणाने पोलिसात धाव घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


