Skip to content

Pune News : गुरुवार पेठेत दुकान फोडून सव्वातीन लाखांची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध खडक पोलिसांत गुन्हा

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : गुरुवार पेठेतील जेधे चेंबरमधील बंद दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने कार्यालयातील तीन लाख २० हजार रुपयांची रोकड चोरून नेली.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

गुरुवार पेठेत दुकान फोडून सव्वातीन लाखांची चोरी अज्ञात चोरट्याविरुद्ध खडक पोलिसांत गुन्हा
गुरुवार पेठेत दुकान फोडून सव्वातीन लाखांची चोरी अज्ञात चोरट्याविरुद्ध खडक पोलिसांत गुन्हा

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : गुरुवार पेठेतील जेधे चेंबरमधील बंद दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने कार्यालयातील तीन लाख २० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. ही घटना २६ ते २७ सप्टेंबरदरम्यान प्रशांत मेल्ट्स कॉर्पोरेशन या दुकानात घडली.https://maharashtramirror.com/ Pune News

याबाबत मार्केटयार्ड परिसरातील ६२ वर्षीय नागरिकाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ आणि ३३१ (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींचे दुकान कुलूप लावून बंद होते. चोरट्याने दुकानाचे कुलूप तोडून शटर उघडले आणि आत प्रवेश केला. त्यानंतर कार्यालयातील ड्रॉवरमध्ये ठेवलेली रोकड चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपीला अद्याप अटक झालेली नाही. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Share