Skip to content

Pune News : विसर्जन मिरवणुकीत चाकूचा धाक दाखवून लूट

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर ; गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी थांबलेल्या ४३ वर्षीय नागरिकाला चार जणांनी मारहाण करून चाकूचा धाक दाखवत एक लाख ४६ हजार ४७६ रुपयांचा ऐवज लुटला.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

विसर्जन मिरवणुकीत चाकूचा धाक दाखवून लूट बेलबाग चौकाजवळ सोनसाखळी आणि मोबाईल हिसकावला; पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास
विसर्जन मिरवणुकीत चाकूचा धाक दाखवून लूट बेलबाग चौकाजवळ सोनसाखळी आणि मोबाईल हिसकावला; पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास

Pune News : बेलबाग चौकाजवळ सोनसाखळी आणि मोबाईल हिसकावला; पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर ; गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी थांबलेल्या ४३ वर्षीय नागरिकाला चार जणांनी मारहाण करून चाकूचा धाक दाखवत एक लाख ४६ हजार ४७६ रुपयांचा ऐवज लुटला. बेलबाग चौकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर २५ सप्टेंबर रोजी रात्री पावणेअकराच्या सुमारास ही घटना घडली.https://maharashtramirror.com/ Pune News

याबाबत वडगाव शेरी येथील रहिवाशाने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९ (६), ११५ (२) आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. https://maharashtramirror.com/ Pune News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मित्र बुधवार चौक परिसरात विसर्जन मिरवणूक पाहत उभे होते. त्यावेळी चार अनोळखी व्यक्तींनी फिर्यादीला पकडून हाताने मारहाण केली. आरोपींनी चाकूचा धाक दाखवून लोखंडी कटरच्या साहाय्याने फिर्यादीच्या गळ्यातील सोनसाखळी कापली. त्यानंतर त्यांच्या पॅन्टच्या खिशातील मोबाईलही जबरदस्तीने हिसकावून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे पुढील तपास करीत आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Share