Skip to content

Pune News : महिलेच्या आत्महत्येप्रकरणी एकाला अटक : मारहाण आणि मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : धानोरीतील ३० वर्षीय महिलेला शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून विश्रांतवाडी पोलिसांनी अभिजीत जगदीश शिंदे (वय ३२, रा.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

महिलेच्या आत्महत्येप्रकरणी एकाला अटक मारहाण आणि मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप
महिलेच्या आत्महत्येप्रकरणी एकाला अटक मारहाण आणि मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : धानोरीतील ३० वर्षीय महिलेला शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून विश्रांतवाडी पोलिसांनी अभिजीत जगदीश शिंदे (वय ३२, रा. मुंजाबावस्ती, धानोरी) याला अटक केली आहे. याबाबत मृत महिलेच्या २१ वर्षीय भावाने फिर्याद दिली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमल दीपक शिंदे (वय ३०) यांनी २२ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास मुंजाबावस्तीतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अभिजीतने प्रेमसंबंधांचे नाटक करून कोमल यांना त्यांच्या पतीपासून वेगळे केले, त्यांचे सोन्याचे दागिने घेऊन मोडले तसेच चारित्र्यावर संशय घेतला, असा आरोप फिर्यादीने केला आहे. मद्यपान करून वारंवार शिवीगाळ व मारहाण करीत शारीरिक आणि मानसिक छळ केल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सचिन राऊत पुढील तपास करीत आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Share