Pune Crime : गर्दीत महिलेचे सव्वालाखाचे मंगळसूत्र चोरीला ; अज्ञात चोरट्याविरुद्ध फरासखाना पोलिसांत गुन्हा
Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर : बुधवार पेठेतील शिवाजी रस्त्यावरून पायी जाणाऱ्या ५० वर्षीय महिलेच्या गळ्यातील एक लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र गर्दीचा फायदा घेऊन चोरण्यात आले.
1 min read

Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर : बुधवार पेठेतील शिवाजी रस्त्यावरून पायी जाणाऱ्या ५० वर्षीय महिलेच्या गळ्यातील एक लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र गर्दीचा फायदा घेऊन चोरण्यात आले. ही घटना २४ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास शानी कार्पेट्सजवळ घडली. https://maharashtramirror.com/ Pune Crime
याबाबत भूकुम (ता. मुळशी) येथील महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला पायी जात असताना अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.https://maharashtramirror.com/ Pune crime
याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अद्याप अटक झालेली नाही. पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत जवळगी पुढील तपास करीत आहेत.


