Skip to content

Pune News : अतिष मोरेला गुन्हे शाखा युनिट-२ कडून अटक

पुणे: अग्निशस्त्राचा (पिस्तूल) वापर करून खुनाचा प्रयत्न केल्याच्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या एका सराईत आरोपीस पुणे शहर पोलीस गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने दरी पुलाजवळ सापळा रचून जेरबंद केले आहे.

VK
Vikrant Kulkarni

2 min read

अतिष मोरेला गुन्हे शाखा युनिट-२ कडून अटक
अतिष मोरेला गुन्हे शाखा युनिट-२ कडून अटक

Pune News : अग्निशस्त्राचा वापर करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या गुन्ह्यातील फरारी आरोपी

पुणे: अग्निशस्त्राचा (पिस्तूल) वापर करून खुनाचा प्रयत्न केल्याच्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या एका सराईत आरोपीस पुणे शहर पोलीस गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने दरी पुलाजवळ सापळा रचून जेरबंद केले आहे. अतिष उमेश मोरे (वय २९, रा. सिंहगड रोड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. https://maharashtramirror.com/ Pune News

गुन्ह्याची पार्श्वभूमी आणि पोलीस मोहीम


पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि गुन्ह्यांत फरार असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत ५ सप्टेंबर २०२६ रोजी आंबेगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील फरारी आरोपींचा शोध युनिट-२ चे अधिकारी व अंमलदार घेत होते. सदर गुन्ह्यात आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम १०९(१), १८९, १९०, १९१(१), ३५१(३) सह आर्म ॲक्ट कलम ३(२५), ३(२७), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) सह १३५ आणि क्रिमिनल लॉ ॲमेंडमेंट ॲक्ट कलम ७ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. घटना घडल्यापासून आरोपी अतिष मोरे हा पोलिसांना चकवा देण्यासाठी स्वतःचे अस्तित्व लपवून वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होता. https://maharashtramirror.com/ Pune News

दरी पुलाजवळ रचला सापळा


आरोपीचा शोध सुरू असतानाच, ९ सप्टेंबर २०२६ रोजी युनिट-२ चे पोलीस अंमलदार उज्ज्वल मोकाशी आणि महेश मंडलिक यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारांकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, फरार आरोपी अतिष मोरे हा आंबेगाव येथील दरी पुलाच्या परिसरात आलेला आहे. अंमलदारांनी ही माहिती तत्काळ युनिट-२ चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांना दिली. https://maharashtramirror.com/ Pune News

माहितीची शहानिशा करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार युनिट-२ च्या पथकाने दरी पूल परिसरात तातडीने धाव घेऊन हुशारीने सापळा रचला आणि आरोपी अतिष मोरे याला ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्याला या गुन्ह्यात अधिकृतरीत्या अटक करण्यात आली आहे. https://maharashtramirror.com/ Pune News

तपास पथकाची कामगिरी


ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश संख्ये यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक अविनाश माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोहार, महिला पोलीस उपनिरीक्षक तेजश्री पवार, पोलीस अंमलदार उज्ज्वल मोकाशी, महेश मंडलिक, शंकर नेवसे, सर्जेराव सरगर, योगेश मांढरे, कुंदन शिंदे, संतोष टकले, शंकर कुंभार, आशिष यादव, विनायक वगारे आणि महिला पोलीस अंमलदार साधना ताम्हाणे व विद्या शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Share