Pune Crime: घरफोडी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद
आठ घरफोडी व एक वाहनचोरीचा गुन्हा उघड, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
1 min read

आठ घरफोडी व एक वाहनचोरीचा गुन्हा उघड, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे शहर गुन्हे शाखेच्या (Pune Crime) दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१ ने घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करत दोन सराईत आरोपी व एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पुणे शहरासह सांगली आणि गुजरातमधील एकूण आठ घरफोडी व एका वाहनचोरीचा गुन्हा उघडकीस आला असून, रोख रक्कम, सोन्याचे दागिने, मोटारसायकल व मोबाईल असा एकूण ११ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.(pune crime branch interstate burglary gang arrested)
कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा (Pune Ceime) समांतर तपास करताना पथकाने सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढला. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार रेंजहिल्स, खडकी परिसरात सापळा रचून धनंजय हरीश काळे (वय २१), यश ऊर्फ गट्ट्या दत्ता देशमुख (वय १९) आणि एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले.
हेही वाचा: CRIME NEWS : दारू वाहतूक प्रकरणी एकाला अटक
तपासादरम्यान आरोपींनी कोथरूड परिसरातील घरफोड्यांची कबुली दिली. चोरीचा मुद्देमाल पिंपरी येथील मोहन नागनाथ नवले याच्यामार्फत विकल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले. आरोपी व रिसीव्हरकडून एकूण ११.११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिस तपासात आरोपींनी कोथरूड पोलीस ठाण्यातील दोन, बिबवेवाडी, सहकारनगर व दिघी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक, तसेच सांगली जिल्ह्यातील संजयनगर पोलीस ठाण्यातील तीन आणि गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील वापी पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्याची कबुली दिली आहे. पुढील तपासासाठी आरोपी, विधीसंघर्षित बालक आणि जप्त मुद्देमाल कोथरूड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
CRIME NEWS : बावधन येथे गांजा विक्री प्रकरणी महिलेला अटक
ही कारवाई पुणे शहराच्या अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१ चे पोलीस निरीक्षक मारुती खेडेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.


