Skip to content

Crime News : भारती विद्यापीठ आणि आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ५ जण तडीपार

पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी :

DO
Dhanshree Otari

1 min read

Crime news

Crime News : पोलीस उपायुक्त झोन-२ मिलिंद मोहिते यांचे आदेश

पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी :

Crime News :
गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये वारंवार सहभागी असलेल्या पाच जणांना पुणे शहर, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन कार्यालयाने महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ अन्वये ही कारवाई केली आहे. (pune crime 5 criminals externed)

पोलीस उपायुक्त परिमंडळ दोनच्या हद्दीतील पोलीस ठाण्यांमध्ये संबंधित आरोपींविरुद्ध जबरी चोरी, बेकायदेशीर हत्यार बाळगणे, दरोड्याची तयारी, खुनाचा प्रयत्न, मारहाण, शिवीगाळ, धमकी, बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारू विक्री, दुखापत करणे, खंडणी घेणे, बेकायदेशीर जमाव करणे, दहशत माजविणे, अनधिकृतपणे जवळ शस्त्र बाळगणे, मालमत्तेचे नुकसान करणे आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे अशा स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत. pune crime

हेही वाचा: Ashadhi Wari 2026 : पुण्यात पालखी सोहळ्यासाठी ७ हजार पोलिसांचा अभूतपूर्व बंदोबस्त

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुमित भिमराव सितापराव (वय २७, रा. निंबाळकर वस्ती, दत्त मंदिरामागे, गुजरवाडी, कात्रज), पृथ्वीराज संजय कांबळे (वय २३, रा. लेन क्रमांक ३, दत्त मंदिरामागे, संतोषनगर, कात्रज) आणि समर्थ योगेश काटे (वय २१, रा. गल्ली क्रमांक २, शिवांजली, दत्तनगर, कात्रज) यांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.

आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आदित्य विनोद नाईक (वय २३, रा. कचरावत चाळ, हनुमाननगर, जांभूळवाडी रोड) आणि निलेश दत्तात्रय सातपुते (वय २३, रा. राजहंस कॉलनी, कोथरूड व विश्वकर्मानगर, आंबेगाव परिसर) यांच्यावरही दोन वर्षांच्या तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. pune crime

Pune Rain Update :  पुण्यात पावसाचा हाहाकार! जुने वाडे, भिंती कोसळल्या

पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे आणि अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. परिमंडळ दोनच्या हद्दीतील अभिलेखावरील क्रियाशील गुन्हेगारांविरुद्ध यापुढील काळातही कठोर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. pune crime

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

Share