Skip to content

इंधन दरवाढीच्या विरोधात पुणे शहर काँग्रेसचा एल्गार

मोदी सरकारच्या निषेधाच्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणला

PG
Prashik Ghaste

1 min read

इंधन दरवाढीच्या विरोधात पुणे शहर काँग्रेसचा एल्गार

मोदी सरकारच्या निषेधाच्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणला

निलेश राऊत
पुणे:
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती गडगडलेल्या असताना आपल्या उद्योगपती मित्रांची तिजोरी भरणारे नरेंद्र मोदी आता कुठल्यातरी युद्धाचे कारण सांगून देशावर इंधन दरवाढीचा बोजा टाकत आहेत. या इंधन दरवाढीमुळे देशातील जनता भरडली जात आहे. या इंधन दरवाढीचा निषेध व्यक्त करण्यासाठी पुणे (पूर्व) शहराध्यक्ष प्रशांत जगताप व पुणे (पश्चिम) शहराध्यक्ष दीप्ती चवधरी यांच्या नेतृत्वात पुणे शहर काँग्रेसच्या वतीने मंगळवारी आंदोलन करण्यात आले.

सामान्य नागरिकांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग
मोदी सरकारच्या निषेधाच्या घोषणांनी संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला. विशेष म्हणजे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसह या आंदोलनात सामान्य पुणेकर नागरिकांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता. या आंदोलनात माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील, प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी, पुणे (पश्चिम) शहराध्यक्ष दीप्ती चवधरी, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, महापालिकेतील गटनेते चंदूशेठ कदम, नगरसेविका दिपाली डोख, नगरसेवक सुनील शिंदे, नगरसेविका अश्विनी लांडगे, मजहर मणियार, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष स्वाती शिंदे, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे, पप्पू घोलप यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.

Share