Skip to content

Pune News : चंदननगर परिसरातील चार प्रमुख रस्त्यांवर पी-१, पी-२ पार्किंग व्यवस्था प्रस्तावित

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे शहरातील चंदननगर वाहतूक विभागांतर्गत इराणी कॅफे सर्कल ते स्वीट इंडिया चौक, बार्कलेज चौक, रेडिसन ब्ल्यू हॉटेल ते टस्कन सोसायटी फेज-२ गेट तसेच बीएनवाय (प्रेस्टीज बिल्डिंग) परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पी-१, पी-२ पार्किंग व्यवस्था

VK
Vikrant Kulkarni

1 min read

चंदननगर परिसरातील चार प्रमुख रस्त्यांवर पी-१, पी-२ पार्किंग व्यवस्था प्रस्तावित
चंदननगर परिसरातील चार प्रमुख रस्त्यांवर पी-१, पी-२ पार्किंग व्यवस्था प्रस्तावित

Pune News :नागरिकांना सूचना व हरकती १६ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे शहरातील चंदननगर वाहतूक विभागांतर्गत इराणी कॅफे सर्कल ते स्वीट इंडिया चौक, बार्कलेज चौक, रेडिसन ब्ल्यू हॉटेल ते टस्कन सोसायटी फेज-२ गेट तसेच बीएनवाय (प्रेस्टीज बिल्डिंग) परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पी-१, पी-२ पार्किंग व्यवस्था प्रस्तावित करण्यात आली आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात निवासी सोसायट्या असून, नागरिकांकडून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दुचाकी व चारचाकी वाहने पार्क केली जातात. त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याने वाहतूक सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी हा बदल प्रस्तावित करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
प्रस्तावित पार्किंग व्यवस्था पुढीलप्रमाणे इराणी कॅफे सर्कल ते स्वीट इंडिया चौकापर्यंत ५०० मीटर अंतरावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पी-१, पी-२ पार्किंग. इराणी कॅफे सर्कल ते बार्कलेज चौकापर्यंत ५०० मीटर अंतरावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पी-१, पी-२ पार्किंग. रेडिसन ब्ल्यू हॉटेल ते टस्कन सोसायटी फेज-२ गेटपर्यंत २०० मीटर अंतरावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पी-१, पी-२ पार्किंग. बीएनवाय (प्रेस्टीज बिल्डिंग) ते टस्कन सोसायटी फेज-३ गेटपर्यंत २०० मीटर अंतरावर पी-१, पी-२ पार्किंग.https://maharashtramirror.com/ Pune News

नागरिकांना आवाहन
याबाबत नागरिकांना काही सूचना किंवा हरकती असल्यास त्यांनी १६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पोलीस उपायुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा, पोस्ट ऑफिस बंगला क्रमांक ६, एअरपोर्ट रोड, पुणे येथे लेखी स्वरूपात सादर कराव्यात.
नागरिकांच्या सूचना व हरकतींचा विचार करून तसेच अग्निशमन दल, पोलीस वाहने, रुग्णवाहिका यांसारख्या अत्यावश्यक सेवेतील वाहनांचा अपवाद वगळून अंतिम आदेश निर्गमित करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त (वाहतूक) डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी दिली आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Share