Pune Crime : गर्दीचा फायदा घेऊन चेन चोरी करणाऱ्या महिलेस अटक
Pune Crime : पुणे: सार्वजनिक वाहतुकीच्या बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन महिला प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या एका २५ वर्षीय महिलेस शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने शिताफीने जाळ्यात पकडून जेरबंद केले आहे.
2 min read

Pune Crime : पावणेतीन लाखांचे मिनीगंठण जप्त; बसमध्ये चढत असताना श्रमीक भवन मनपा बस स्टॉप येथे घडला प्रकार
Pune Crime : पुणे: सार्वजनिक वाहतुकीच्या बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन महिला प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या एका २५ वर्षीय महिलेस शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने शिताफीने जाळ्यात पकडून जेरबंद केले आहे. भाग्यश्री बबलु काळे (वय २५, रा. विश्रांतवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे.https://maharashtramirror.com/ Pune crime
मिळालेल्या माहितीनुसार, २ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे महानगरपालिका (मनपा) ते खराडी जाणार्या बसमध्ये चढत असताना श्रमीक भवन मनपा बस स्टॉप येथे एका महिला प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याचे मिनीगंठण बसमधील गर्दीचा गैरफायदा घेऊन अज्ञात चोरट्याने लांबवले होते. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता.https://maharashtramirror.com/ Pune crime
सीसीटीव्ही आणि गुप्त बातमीदाराच्या आधारे कारवाई
गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता, त्यात एक संशयित महिला वावरताना दिसून आली. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ९ सप्टेंबर २०२६ रोजी पोलीस अंमलदार दीपक चव्हाण व श्रीकृष्णा सांगवे शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत होते.https://maharashtramirror.com/ Pune crime
त्यादरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमधील वर्णनाशी मिळतीजुळती महिला मनपा बस स्टॉपवर संशयितरीत्या फिरत असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. सहायक पोलीस निरीक्षक पाटील व त्यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन सापळा रचला व महिलेस ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली.https://maharashtramirror.com/ Pune crime
नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
आगामी गणेशोत्सवादरम्यान सार्वजनिक देखावे, मिरवणुका आणि गर्दीच्या ठिकाणी येणाऱ्या महिलांनी आपल्या अंगावरील सोन्या-चांदीच्या दागिन्यांची आणि किमती वस्तूंची योग्य काळजी घ्यावी व सतर्क राहावे, असे आवाहन शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर यांनी केले आहे.
तपास पथक
ही मोहीम अप्पर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) राजेंद्र बनसोडे, पोलीस उपायुक्त (परिमंडळ १) कृषीकेश रावळे, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (विश्रामबाग विभाग) अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमर काळंगे यांच्या सूचनेनुसार पार पडली. या कारवाईत सपोनि संतोष पाटील, पोलीस अंमलदार सचिन जाधव, दीपक चव्हाण, महावीर वलटे, राजकिरण पवार, इसाक पठाण, दीपक रोमाडे, श्रीकांत मखरे, श्रीकृष्ण सांगवे आणि महेंद्र कडू यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.


