Pune News : भिडे पुलावर अल्पवयीन मुलावर जीवघेणा हल्ला; सहा विधिसंघर्षित बालकांना ताब्यात
Pune News : पुणे : जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका १६ वर्षीय मुलावर लोखंडी हत्यारांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना डेक्कन परिसरातील भिडे पुलाजवळील नदीपात्रात घडली.
1 min read

Pune News : जुन्या भांडणाचा राग मनात धरून लोखंडी हत्यारांनी वार
Pune News : पुणे : जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका १६ वर्षीय मुलावर लोखंडी हत्यारांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना डेक्कन परिसरातील भिडे पुलाजवळील नदीपात्रात घडली. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी सहा विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ९ ते ९.५० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी १६ वर्षीय मुलगा हा आपल्या मित्रांसोबत बाहेर फिरण्यासाठी गेला होता. त्यावेळी आरोपी विधिसंघर्षित बालकांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून त्याला भिडे पुलाजवळील नदीपात्रात भेटण्यासाठी बोलावले. तेथे गेल्यानंतर आरोपी आणि त्यांच्या साथीदारांनी संगनमत करून लोखंडी हत्यारांनी फिर्यादीवर हल्ला केला. त्याच्या डोक्यावर, डोक्याच्या मागील बाजूस, हाताच्या पोटरीवर, तळहातावर तसेच बोटांवर वार करण्यात आले. जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने करण्यात आलेल्या या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला..https://maharashtramirror.com/ Pune News
या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०९, १८९(२), १८९(३), १९०, १९१(२), १९१(३), आर्म अॅक्ट कलम ४(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(२) आणि १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सहा विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) रणजितसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


