Skip to content

Pimpari Crime: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला ठार मारले

Pimpari Crime : पिंपरी : पत्नीच्या चरित्र्यावर संशय घेवून धारदार हत्याराने गळ्यावर वार करून तिला जागीच ठार मारल्याची घटना बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा ठार मारले
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा ठार मारले

Pimpari Crime : पिंपरी : पत्नीच्या चरित्र्यावर संशय घेवून धारदार हत्याराने गळ्यावर वार करून तिला जागीच ठार मारल्याची घटना बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या घटनेत निलाबाई परशुराम हरिजन यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत फिर्यादी सुरेश परशुराम हरिजन (वय २४, व्यवसाय- ड्रायव्हर, रा. तोडकर वस्ती, भुगाव रोड, बावधन, मूळ गाव विजापूर, कर्नाटक) यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी सुरेश यांचे वडील आरोपी परशुराम भागप्पा हरिजन (वय ४८) यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. आरोपी परशुराम हे त्यांची पत्नी निलाबाई यांच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होते. याच संशयावरून झालेल्या भांडणात आरोपीने धारदार हत्याराने पत्नीच्या गळ्यावर वार करून तिला जागीच ठार मारले आणि घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उपनिरीक्षक गिरी अधिक तपास करत आहेत.https://maharashtramirror.com/ Pimpari Crime

Share