Pune Crime : ५० कोटींच्या खंडणीप्रकरणी आरोपी जेरबंद
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून तपास पथकाचा गौरव
2 min read

Pune Crime : पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून तपास पथकाचा गौरव

Pune Crime : पुणे : नामांकित व्यावसायिकाकडे तब्बल ५० कोटी रुपयांची खंडणी मागून, त्यानंतर त्याच्या कंपनीच्या गेटवर चार राऊंड गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्या चार आरोपींना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने हरियाणा आणि राजस्थानमधून जेरबंद केले. या कारवाईत तीन गावठी पिस्तुले आणि ३० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. गुन्ह्याचा छडा लावणाऱ्या गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रशस्तीपत्रक देऊन गौरव केला.२२ जून २०२६ रोजी पुण्यातील नामांकित व्यावसायिक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना फोन करून आरोपींनी ५० कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. खंडणीची मागणी केल्यानंतर अवघ्या दोन तासांनी दोन फायररनी संबंधित व्यावसायिकाच्या कंपनीच्या गेटवर चार राऊंड गोळीबार केला. या घटनेमुळे परिसरात मोठी दहशत निर्माण झाली होती. Pune Crime :https://maharashtramirror.com/
घटनेनंतर गुन्हे शाखेच्या पथकांनी तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गोळीबार करणाऱ्या आरोपींची ओळख पटवली. मात्र, गुन्हा केल्यानंतर आरोपी परराज्यात फरार झाले होते. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार आरोपींच्या शोधासाठी गुन्हे शाखेची स्वतंत्र पथके हरियाणा, राजस्थान, गुजरात आणि पंजाब येथे रवाना करण्यात आली.सलग पाच दिवस विविध ठिकाणी छापे टाकल्यानंतर २ जुलै रोजी पवन प्रकाशराम बारड (वय २४, रा. हनुमानगढ जंक्शन, राजस्थान) याला हनुमानगढ येथून अटक करण्यात आली. त्यानंतर संबंधित कंपनीतील माहिती फायरिंग करणाऱ्या आरोपींना पुरविणारा कामगार सत्यप्रकाश कालुराम शिलोरा (वय २५, रा. हांडेवाडी, पुणे) याला ४ जुलै रोजी अटक करण्यात आली. Pune Crime https://maharashtramirror.com/

दरम्यान, ७ जुलै रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हनुमानगढ, राजस्थान येथील रेल्वे फाटकाजवळ पाहिजे आरोपी रवीकुमार राजेंद्रकुमार जांगडा (वय ३३, रा. हरियाणा) आणि एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.रवीकुमार जांगडा याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि दहा जिवंत काडतुसे, तर विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून दोन गावठी पिस्तुले आणि २० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.या प्रकरणात ५० कोटी रुपयांची खंडणी मागण्यामागील नेमका उद्देश, गोळीबाराचे नियोजन तसेच आरोपींना कंपनीतील माहिती पुरविण्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे. Pune Crime https://maharashtramirror.com/
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जीवन माने, प्रशांत अन्नछत्रे, अमर कदम, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, श्रीकांत चव्हाण, प्रसन्ना जराड, पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम, महिला पोलीस उपनिरीक्षक तेजश्री पवार यांच्यासह गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. परराज्यात जाऊन सलग पाच दिवस तपास करत गंभीर गुन्ह्याचा छडा लावून चार आरोपींना जेरबंद करणाऱ्या पोलिसांच्या कामगिरीचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कौतुक केले. त्यांनी तपास पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरव केला. Pune Crime


