Prasad Malai Chaha : 'प्रसाद मलाई चहा' चा मालक गोत्यात: तरुणीवर विनयभंगाचा प्रयत्न
पुणे महाराष्ट्र मिरर
1 min read

Prasad Malai Chaha : जिमच्या पार्किंगमध्ये लग्नाचे आमिष दाखवून केले गैरवर्तन
पुणे महाराष्ट्र मिरर
Prasad Malai Chaha : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला आणि अल्पवधीतच लोकप्रिय झालेला 'प्रसाद मलाई चहा' वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चहाच्या मालकाने जिमच्या पार्किंगमध्ये एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ( prasad malai chaha owner crime case sinhagad road )
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सागर उर्फ प्रसाद सोंडकर हा खेड-शिवापूर येथे 'प्रसाद मलाई चहा' हे हॉटेल चालवतो. जून २०२६ मध्ये इन्स्टाग्रामच्या माध्यमातून पीडित तरुणी आणि आरोपीची ओळख झाली. आरोपीने स्वतःची खोटी माहिती देत तरुणीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर काही दिवसांतच त्याने तरुणीला भेटण्यासाठी आग्रह धरला. Prasad Malai Chaha

PMC Fraud : महापालिकेत ‘टॅक्स’ कपातीचे आमिष दाखवून ६ लाखांचा गंडा
लग्नाचे खोटे आमिष आणि गैरवर्तन
आरोपीने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. ३० जून २०२६ रोजी संध्याकाळी ७ च्या सुमारास आरोपीने तरुणीला माणिकबाग येथील 'नायट्रोजिम' जिमच्या पार्किंगमध्ये बोलावले. तिथे आपल्या चारचाकी गाडीत बसून त्याने तरुणीशी बोलताना पुन्हा लग्नाचा विषय काढला. यावेळी आरोपीने तरुणीचा हात धरून तिला जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही तर, "मला आता कंट्रोल होत नाही," असे म्हणत त्याने तरुणीच्या इच्छेविरुद्ध शारीरिक गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. आरोपीच्या या कृत्याने घाबरलेल्या तरुणीने त्याला विरोध करत घटनास्थळावरून काढता पाय घेतला.

Moshi Tragedy : मृतांच्या वारसांना आर्थिक मदत मिळण्यास प्रारंभ
सुरुवातीला आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवलेल्या तरुणीला नंतर समजले की, सागर सोंडकर हा विवाहित असून त्याला दोन मुलेही आहेत. त्याने केवळ लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पीडित तरुणीने हिंमत दाखवत १६ जुलै २०२६ रोजी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपीविरुद्ध तक्रार नोंदवली. Prasad Malai Chaha

सिंहगड रोड पोलिसांनी आरोपी सागर सोंडकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (B.N.S.) कलम ७५(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार अडगळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)


