Skip to content

Pune Crime : हडपसरमध्ये पुनावाला ग्रुपच्या सिक्युरिटी वाहनावर पुणे पोलिसांची कारवाई

Pune Crime :पुणे : हडपसर-साडेसतरानाळी परिसरात पुनावाला ग्रुपच्या खाजगी सुरक्षा वाहनांवर पोलिसांच्या वाहनांप्रमाणे बेकायदेशीरपणे लाल-निळे फ्लॅशर दिवे वापरल्याप्रकरणी पुणे शहर वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई केली आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

हडपसरमध्ये पुनावाला ग्रुपच्या सिक्युरिटी वाहनावर पुणे पोलिसांची कारवाई
हडपसरमध्ये पुनावाला ग्रुपच्या सिक्युरिटी वाहनावर पुणे पोलिसांची कारवाई

Pune Crime :पुणे : हडपसर-साडेसतरानाळी परिसरात पुनावाला ग्रुपच्या खाजगी सुरक्षा वाहनांवर पोलिसांच्या वाहनांप्रमाणे बेकायदेशीरपणे लाल-निळे फ्लॅशर दिवे वापरल्याप्रकरणी पुणे शहर वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. नागिरकांच्या तक्ररीची दखल घेत पोलिसांना ही कारवाई केली आहे.https://maharashtramirror.com/ Pune Crime

हडपसर परिसरातील साडेसतरा नळी येथील स्थानिक नागरिकांनी काही दिवसांपूर्वी, पुणे शहर पोलीस आयुक्त तसेच वाहतूक पोलीस उपायुक्तांकडे पुराव्यांसह तक्रार अर्ज सादर केला होता. तक्रारीमध्ये त्यांनी नमूद केले होते की, पुनावाला ग्रुपच्या सिक्युरिटी गार्ड्सकडून त्यांच्या खाजगी सुरक्षेसाठी वापरल्या जाणाऱ्या गाड्यांवर पोलिसांसारखे लाल-निळे फ्लॅशर दिवे लावून बेकायदेशीरपणे वापर केला जात आहे. खाजगी वाहनांवर अशा प्रकारचे फ्लॅशर दिवे लावणे हा थेट वाहतूक नियमांचा आणि मोटार वाहन कायद्याचा भंग आहे, असे सांगत त्यांनी या वाहनांवर तातडीने दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती.https://maharashtramirror.com/ pune crime

दरम्यान, अर्जाची दखल हडपसर वाहतूक विभागाने गांभीर्याने घेतली. हडपसर वाहतूक विभागाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश ढमे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनावाला ग्रुपच्या सिक्युरिटी गार्ड्सच्या 'क्यूआरटी' (Quick Response Team) महिंद्रा बोलेरो गाडीवर (क्रमांक MH 12 UN 4022) मोटार वाहन कायद्यांतर्गत रीतसर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या कारवाईचा दंड संबंधित घटकाकडून ऑनलाईन स्वरूपात भरून घेण्यात आला असून, चौकशीअंती तक्रार अर्ज दप्तरी दाखल करण्यात आला आहे.

पोलीस प्रशासनाने घेतलेल्या या कडक भूमिकेनंतर आणि झालेल्या कायदेशीर कारवाईनंतर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने (Serum Institute of India Pvt. Ltd.) २८ सप्टेंबर रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (RTO) अधिकृत परवानगीसाठी अर्ज सादर केला आहे.

खाजगी कंपन्या किंवा व्हीआयपी सुरक्षेच्या नावाखाली नियमांचे उल्लंघन करून वाहनांवर लाल-निळे फ्लॅशर दिवे वापरणाऱ्यांविरोधात पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. नियम हे सर्वांसाठी समान असतात, मग ती खाजगी व्यक्ती असो किंवा मोठी उद्योग संस्था; त्यामुळे पोलिसांची ही कारवाई वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्यांसाठी एक सकारात्मक संदेश देणारी ठरली आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Share