Skip to content

Political News : जीएस सॉफ्टवेअर कंपनीलाच टीईटी परिक्षेचे कंत्राट

पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : टीईटी परिक्षेचा डिसेंबर २०२१ मध्ये पेपर फुटल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत जीएस सॉफ्टवेअर कंपनीचा मालक प्रितीश देशमुख याला अटक केली.

VZ
Vidula Zagade

2 min read

Political News : जीएस सॉफ्टवेअर कंपनीलाच टीईटी परिक्षेचे कंत्राट

शिवसेनेचे मुख्यमंत्री फडणवीसांच्या आरोपाला प्रत्युत्तर

पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : टीईटी परिक्षेचा डिसेंबर २०२१ मध्ये पेपर फुटल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत जीएस सॉफ्टवेअर कंपनीचा मालक प्रितीश देशमुख याला अटक केली. २०१४ ते २०१९ या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या कार्यकाळात याच कंपनीला परीक्षा व्यवस्थापनाचे कंत्राट दिले होते. तसेच, या प्रकरणी तुरूंगातून बाहेर आलेल्या अभिषेक सावरीकरचाही भाजपमध्ये पक्ष प्रवेश करून घेण्यात आल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला.Political News

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी“सर्वात मोठा टीईटी घोटाळा ठाकरे सरकारच्या काळात झाला” असा आरोप केल्यानंतर शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुण्यात परिषद घेऊन त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. यावेळी त्यांनी टीईटी घोटाळ्याच्या तपासाची साखळी मांडत त्यांनी फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केले.

सुषमा अंधारे म्हणाल्या, डिसेंबर २०२१ मध्ये टीईटी परीक्षेचा पेपर फुटी प्रकरणात प्रितीश देशमुख याच्यावर पोलिस कारवाई करण्यात आली. त्याच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीत अभिषेक सावरीकरचे नाव समोर आले. त्यानंतर अभिषेक सावरीकरने चौदा एजंट आणि शिक्षण अधिकारी तुकाराम सुपे यांची नावे सांगितली. तुकाराम सुपे यांनी तत्कालीन शिक्षण उपसचिव सुशील खोडवेकर यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचे चौकशीत नमूद केल्याचा दावाही त्यांनी केला. “ठाकरे सरकारने या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले नाही. दोषी आढळलेल्या सर्वांना तुरुंगात पाठवले. इतकेच नव्हे, तर तत्कालीन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलीचे नाव समोर आल्यानंतर तिलाही ब्लॅकलिस्ट करण्यात आले. हीच आमच्या सरकारची पारदर्शकता होती,” असे अंधारे म्हणाल्या.Political News

यावेळी त्यांनी भाजपवरही निशाणा साधत अभिषेक सावरीकर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी त्याचा पक्षप्रवेश करून घेतल्याचा आरोप केला. तसेच सुशील खोडवेकर हे नंतर तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्याचाही दावा त्यांनी केला.
तपास अधिकारी भाग्यश्री नवटाके यांना ठाकरे सरकारने ‘फ्री हँड’ दिला होता. मात्र, फडणवीस सरकारने त्यांची बदली करून त्यांना गोंदिया येथे पाठवले, असा आरोपही त्यांनी केला.

सुषमा अंधारे यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

‘मी आज केलेल्या आरोपांबाबत तुमच्याकडे स्पष्टीकरण असेल तर ते द्या. अन्यथा उद्या आणखी पुराव्यांसह तुमचा खोटारडेपणा जनतेसमोर उघड करेन, असे आवाहनही सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.Political News

Political News

Share