Skip to content

बिबवेवाडीत आयुर्वेदिक उपचार केंद्रावर पोलिसांचा छापा

दोन पीडित महिलांची सुटका; वेश्याव्यवसाय प्रकरणी महिला आरोपी अटकेत

PG
Prashik Ghaste

1 min read

बिबवेवाडीत आयुर्वेदिक उपचार केंद्रावर पोलिसांचा छापा

दोन पीडित महिलांची सुटका; वेश्याव्यवसाय प्रकरणी महिला आरोपी अटकेत

पुणे: पुणे शहर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाने बिबवेवाडी परिसरातील “विश्वा आयुर्वेदिक उपचार केंद्र” येथे छापा टाकून वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून एका महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, सर्वे नं. ६३५, श्रेयस निंबस सोसायटी, शनी मारुती मंदिरासमोर, महेश सोसायटी, बिबवेवाडी येथील स्पा मसाज सेंटरमध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली बनावट ग्राहक पाठवून खात्री करण्यात आली.

त्यानंतर पोलिसांनी अचानक छापा टाकून दोन महिलांची सुटका केली. तसेच किरण भरतराज अवदुते (वय ३०, रा. बिबवेवाडी) हिला ताब्यात घेण्यात आले.

याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम १४३ (१)(३) तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा १९५६ अंतर्गत कलम ३, ४ आणि ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त गुन्हे पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक विशांत चव्हाण यांच्यासह आंधळे, भिवरकर, केदार, रसाळ, कोंडे आणि इंगळे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Share