Pune News: दहा वर्षीय तेजस पालकांच्या स्वाधीन
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या कोथरूड आगारातील कर्मचारी आणि तपासणी पथकाने दाखवलेली तत्परता, प्रसंगावधान आणि माणुसकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
1 min read

Pune News : कोथरूड आगारातील कर्मचाऱ्यांनी जपली सामाजिक बांधिलकी

(Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या कोथरूड आगारातील कर्मचारी आणि तपासणी पथकाने दाखवलेली तत्परता, प्रसंगावधान आणि माणुसकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. बसमध्ये राहून गेलेल्या दहा वर्षीय तेजस पुंडलिक खराटे या मुलाचा तातडीने शोध घेत त्याला सुखरूपपणे आई-वडिलांच्या ताब्यात देत कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकीचे आणि संवेदनशीलतेचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले.https://maharashtramirror.com/ Pune News
कोथरूडमध्ये दर गुरुवारी तपासणी पथक काम करते. तपासणीचे काम करीत असताना ही बाब त्यांच्या निदर्शनास आली. बस क्रमांक २७६/७ (MH 14 HU 5375) ही एनडीए गेट येथून सकाळी साडे दहा वाजता चिंचवड गावाच्या दिशेने मार्गस्थ झाली होती. वडाच्या बसथांब्यावर प्रवासी उतरले; मात्र त्यांचा दहा वर्षीय मुलगा तेजस पुंडलिक खराटे, (रा. वसमत, जि. हिंगोली) हा बसमध्येच राहून गेला. https://maharashtramirror.com/ Pune News
मुलगा बसमध्ये राहिल्याची माहिती मिळताच वाहक गणेश रांगडे आणि क्लार्क नितीन सुरेश पगारे यांनी कोणताही विलंब न करता त्याचा शोध सुरू केला. वनदेवी परिसरातील बँक ऑफ महाराष्ट्रजवळ तेजस रडत असताना त्यांना आढळून आला. कर्मचाऱ्यांनी त्याला धीर देत सुरक्षितपणे कर्वेनगर पोलीस चौकीत नेले. तेथे पोलिस उपनिरीक्षक नायकवाडे त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने आवश्यक कार्यवाही करण्यात आली. त्यानंतर तेजसला त्याचे वडील पुंडलिक खराटे आणि आई सौ. सीमा खराटे यांच्या ताब्यात सुखरूपपणे देण्यात आले.या संवेदनशील आणि कौतुकास्पद कामगिरीबद्दल कोथरूड आगाराचे व्यवस्थापक सचिन वाबळे यांनी गणेश रांगडे आणि नितीन सुरेश पगारे यांचे विशेष कौतुक केले.https://maharashtramirror.com/ Pune News
पीएमपीएमएल ची सेवा ही केवळ प्रवासी वाहतूक नसून जनसेवा, सामाजिक बांधिलकी आणि माणुसकी जपण्याचे माध्यम आहे, याचे हे उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे. कोथरूड आगारातील कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या तत्परता, संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. नागेश गायकवाड — जनसंपर्क अधिकारी, पीएमपीएमएल https://maharashtramirror.com/


