Skip to content

Pune News : पीएमपीएमएलच्या चालक-वाहकाने दाखविली माणुसकी; प्रकृती बिघडलेल्या महिला प्रवाशाला तातडीने ससून रुग्णालयात पोहोचविले

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : पीएमपीएमएलच्या चालक आणि वाहकाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे प्रकृती अचानक खालावलेल्या महिला प्रवाशाला वेळीच वैद्यकीय मदत मिळाली.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

पीएमपीएमएलच्या चालक-वाहकाने दाखविली माणुसकी; प्रकृती बिघडलेल्या महिला प्रवाशाला तातडीने ससून रुग्णालयात पोहोचविले
पीएमपीएमएलच्या चालक-वाहकाने दाखविली माणुसकी; प्रकृती बिघडलेल्या महिला प्रवाशाला तातडीने ससून रुग्णालयात पोहोचविले

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : पीएमपीएमएलच्या चालक आणि वाहकाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे प्रकृती अचानक खालावलेल्या महिला प्रवाशाला वेळीच वैद्यकीय मदत मिळाली. त्यांच्या या तत्परतेचे आणि माणुसकीचे सर्वत्र कौतुक होत आहे. हडपसर रेल्वे स्टेशन ते पुणे रेल्वे स्टेशनदरम्यान धावणाऱ्या ‘रात्र राणी’ बस क्रमांक ५/१ मधून विशाखा सुधाकर गवई या प्रवास करत होत्या. रात्री सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास त्यांची अचानक प्रकृती खालावली. ही बाब लक्षात येताच बसचे कायम वाहक गोरखनाथ चव्हाण आणि कायम चालक राजेंद्र निकम यांनी प्रसंगावधान राखत बस थेट ससून रुग्णालयाच्या आवारात नेली.https://maharashtramirror.com/ Pune News
रुग्णालयात संबंधित महिलेला डॉक्टरांच्या मदतीने आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले. त्यानंतर वैद्यकीय पथकाकडे उपचारांची जबाबदारी सोपवून चालक व वाहकाने इतर प्रवाशांचीही काळजी घेत बस पुढील मार्गावर रवाना केली. या घटनेतून पीएमपीएमएलचे कर्मचारी केवळ प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचविण्याचेच नव्हे, तर संकटाच्या प्रसंगी त्यांच्या सुरक्षिततेसाठी धावून जाण्याचेही कर्तव्य पार पाडतात, हे अधोरेखित झाले आहे. पीएमपीएमएलचे जनसंपर्क अधिकारी नागेश गायकवाड यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. त्यांची तत्परता, संवेदनशीलता आणि कर्तव्यनिष्ठा इतर कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.https://maharashtramirror.com/ Pune News

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Share