Skip to content

PMC WATER NEWS : पुण्यातील काही भागात गुरूवारी पाणी पुरवठा बंद

पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : पुणे महापालिका बंडगार्डन पाणीपुरवठा विभागामार्फत पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील निगडी भक्ती शक्ती चौक येथील मुख्य जलवाहिनी स्थलांतर करण्याचे काम आणि होळकर जलशुद्धीकरण केंद्र येथील विद्युत विषयक दुरुस्तीची व गळतीची कामे येत्या गुरुवारी ( दि.

VZ
Vidula Zagade

1 min read

PMC WATER NEWS : पुण्यातील काही भागात गुरूवारी पाणी पुरवठा बंद

पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : पुणे महापालिका बंडगार्डन पाणीपुरवठा विभागामार्फत पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील निगडी भक्ती शक्ती चौक येथील मुख्य जलवाहिनी स्थलांतर करण्याचे काम आणि होळकर जलशुद्धीकरण केंद्र येथील विद्युत विषयक दुरुस्तीची व गळतीची कामे येत्या गुरुवारी ( दि. २३) करण्यात येणार आहे. त्यामुळे विश्रांतवाडी, म्हस्के वस्ती, विमाननगर परिसरात गुरुवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
तसेच, शुक्रवारी ( दि.२४) रोजी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.PMC WATER NEWS

पाणीपुरवठा बंद असणारा भाग खालील प्रमाणे


१) बंडगार्डन पाणीपुरवठा विभागाकडील भाग :- म्हस्के वस्ती, गणेशनगर (बोपखेल), कळस माळवाडी, जाधव वस्ती, विश्रांतवाडी, संजय पार्क, बर्माशेल, विमानतळ व भोवतालाचा परिसर, खराडीचा काही परिसर, हरी गंगा टाकीवर अवलंबून असणारा भाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटी, आहील्यानगर, मैनिक नगर, हरीगंगा सोसायटी, समाज कल्याण वसतीगृह, विश्रांतवाडी पोलिस लाईन, आरोग्यभवन, शांतीनगर, भारतनगर, कतारवाडी, प्रतिकनगर, जेसिडी पार्क, वृंदावन सोसायटी, उत्तम टाउन शिप, मित्तल सोसायटी, ड्रीम सोसायटी, जाधव नगर, पंचशिल नगर, श्रमिक नगर, कामगार नगर, चंद्रमा नगर,


२) चतुश्रुंगी पाणीपुरवठा विभागाकडील भाग :
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड, अॅम्युनेशन फॅक्टरी खडकी, मुळा रोड परिसर, भोईटे वस्ती.

PMC WATER NEWS

Share