Skip to content

PMC News : छ. संभाजी उद्यान येथील धोकादायक बहुमजली पार्किंग होणार जमीनदोस्त

पुणे, महाराष्ट्र मिरर PMC News : देखभाल दुरूस्तीअभावी धोकादायक झालेले आणि व्यवस्थापन सांभाळण्यासाठी कुशल ठेकेदार मिळत नसल्याने छत्रपती संभाजी उद्यान येथील पुणे महापालिकेने उभारलेले बहुमजली मेकनिकल पार्किंगच जमीनदोस्त करण्यात येणार आहे.PMC News

VZ
Vidula Zagade

1 min read

pmc

पुणे, महाराष्ट्र मिरर PMC News : देखभाल दुरूस्तीअभावी धोकादायक झालेले आणि व्यवस्थापन सांभाळण्यासाठी कुशल ठेकेदार मिळत नसल्याने छत्रपती संभाजी उद्यान येथील पुणे महापालिकेने उभारलेले बहुमजली मेकनिकल पार्किंगच जमीनदोस्त करण्यात येणार आहे.PMC News

सदरच्या पार्किंगचा वापर होत नसल्याने आणि त्याची देखभाल व दुरुस्ती तसेच व्यवस्थापनासाठी विशेष प्राविण्य आणि अनुभव असलेले ठेकेदार उपलब्ध होत नसल्याची हतबलता महापालिका प्रशासनाने गुरुवारी (दि.२३) स्थायी समितीच्या बैठकीत व्यक्त केली.PMC News

यावेळी प्रशासनाने या पार्किंगची नियमित देखभाल दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे सदरचे पार्किंगचे स्ट्रक्चर धोकादायक झाले आहे. तसेच त्याचा पुर्नवापर करण्याकरिता आवश्यक असलेला खर्च पार्किंगच्या वापराचे संभावित फायद्यापेक्षा खूप जास्त असल्याने तसेच तो आर्थिक दृष्टीने फायदेशीर होत नसल्याने, सदरचे पार्किंगचे धोकादायक झालेले स्ट्रक्चर काढण्याची मंजुरी मागितली होती.

हे पार्किंग हटविण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. यात चार जणांनी निविदा भरल्या होत्या. त्यापैकी निविदादार मे. स्पार्कटेक इंजिनिअरींग, हडपसर इंडस्ट्रीयल इस्टेट, हडपसर, यांची जीएसटीसह एकोणतीस हजार रूपये या दरानुसार काम करून घेण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.PMC News

पुणे महापालिकेचा हा निर्णय म्हणजे उशीरा सुचलेल शहाणपण. या पुढील काळात कोणत्याही प्रकल्पाची उभारणी करताना योग्य विचार करावा. भविष्यात अशाप्रकारचे पांढरे हत्ती महापालिकेने पोसू नयेत. सामान्य नागरिकाला केंद्रबिंदू ठेवून कोणत्याही प्रकल्पाची उभारणी करावी.

संदीप खर्डेकर, क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष, भाजप नेते

PMC News

Share