Skip to content

PMC News : ७५ कोटींची रस्ते निविदा अखेर रद्द

पुणे, महाराष्ट्र मिरर PMC News : शहरातील रस्त्यांची दुरुस्ती आणि पुनर्डांबरीकरणासाठी काढण्यात आलेली ७५ कोटी रुपयांची एकत्रित निविदा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आज अखेर रद्द केली.

VZ
Vidula Zagade

1 min read

PMC News : ७५ कोटींची रस्ते निविदा अखेर रद्द

दहा-दहा कोटींचे स्वतंत्र पॅकेज; आयुक्त नवल किशोर राम यांचे आदेश

पुणे, महाराष्ट्र मिरर PMC News : शहरातील रस्त्यांची दुरुस्ती आणि पुनर्डांबरीकरणासाठी काढण्यात आलेली ७५ कोटी रुपयांची एकत्रित निविदा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आज अखेर रद्द केली. या कामांसाठी आता दहा-दहा कोटी रुपयांच्या स्वतंत्र निविदा काढण्याचे आदेश त्यांनी पथ विभागाला दिले आहेत. त्यामुळे निविदा प्रक्रियेत अधिक ठेकेदारांना सहभागी होता येणार असून, स्पर्धाही वाढणार आहे, अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.PMC News

महापालिकेच्या पथ विभागाने शहरातील विविध रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ७५ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केली होती. मात्र, निविदेतील आर्थिक आणि तांत्रिक अटींची पूर्तता केवळ मोठ्या ठेकेदारांकडूनच होण्याची शक्यता होती. त्यामुळे छोट्या व मध्यम स्वरूपाच्या ठेकेदारांना या प्रक्रियेत सहभागी होणे कठीण झाले होते. एकाच ठेकेदाराला एवढ्या मोठ्या रकमेचे काम दिल्यास कामाच्या गुणवत्तेवर आणि कालमर्यादेवर परिणाम होण्याची शक्यताही व्यक्त केली जात होती.PMC News

या पार्श्वभूमीवर आयुक्त नवल किशोर राम यांनी निविदेची फेररचना करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ७५ कोटी रुपयांच्या कामांचे क्षेत्रनिहाय विभाजन करून दहा-दहा कोटी रुपयांची पॅकेज तयार केली जाणार आहेत. पथ विभागाकडून सात ते आठ स्वतंत्र निविदा प्रसिद्ध केल्या जाण्याची शक्यता आहे.PMC News

निविदांचे विभाजन झाल्याने अधिक ठेकेदारांमध्ये स्पर्धा निर्माण होईल. तसेच कामांचा दर्जा, वेग आणि नियंत्रण सुधारण्यास मदत होईल, असा महापालिका प्रशासनाचा दावा आहे. नवीन निविदा प्रक्रिया तातडीने सुरू करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या आहेत.PMC News

PMC News

Share