Skip to content

Pune News : पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता परीक्षेत गैरप्रकार; पाच जणांवर गुन्हा दाखल

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदाच्या भरती परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता परिक्षेत गैरप्रकार; पाच जणांवर गुन्हा दाखल
पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता परिक्षेत गैरप्रकार; पाच जणांवर गुन्हा दाखल

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदाच्या भरती परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी तीन संशयित उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. तसेच, या उमेदवारांना मदत करणाऱ्या संभाजीनगर येथील परीक्षा केंद्रावरील दोन कर्मचारी अशा पाच जणांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी पत्रकार परिषदेत दिली. https://maharashtramirror.com/ Pune News

काही उमेदवारांना परीक्षेपूर्वी प्रश्न उपलब्ध करून दिल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. संभाजीनगर येथील परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला. संबंधित तीन उमेदवारांनी परीक्षा सुरू असताना काही वेळ प्रश्नपत्रिका पाहिली, त्यानंतर वारंवार स्वच्छतागृहात जाऊन मोबाईल किंवा अन्य तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्तरे मिळवली. दरम्यान, परीक्षा केंद्रातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणात केंद्रावरील दोन कर्मचाऱ्यांनी या विद्यार्थ्यांना मदत केल्याचे निष्पन्न झाले.https://maharashtramirror.com/ Pune News

पात्र उमेदवारांच्या नियुक़्तीची प्रक्रिया सुरू

परीक्षा सुरू होण्यापूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याचा कोणताही थेट पुरावा आढळलेला नाही. हा गैरप्रकार केवळ या तीन उमेदवारांपुरताच मर्यादित असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. त्यामुळे या तीनही संशयित विद्यार्थ्यांची उमेदवारी व निवड रद्द करण्यात आली असून, महापालिकेने १६९ पैकी १४६ पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

Share