Skip to content

PMC : अखेर पुणे महापालिकेच्या 'त्या' शिपायावर कारवाईचा बडगा

पुणे, महाराष्ट्र मिरर

DO
Dhanshree Otari

1 min read

PMC

PMC : पुणे महापालिकेत नोकरीचे आमिष दाखवून कोट्यवधींचा गंडा; बनावट भरती घोटाळ्याचा पर्दाफाश, शिपाई निलंबित

पुणे, महाराष्ट्र मिरर

PMC : पुणे महानगरपालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अखेर गुन्हा (FIR) दाखल झाला असून, महापालिका शिक्षण विभागातील शिपाई शिवानंद पाटील याला प्रशासनाने तातडीने निलंबित केले आहे. या कारवाईमुळे महापालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ( PMC Job Scam shivanand patil suspended )

सुभाष गोयल समुह प्रकल्पाला एक लाखाचा दंड

राजेंद्र खेडेकर, शिवानंद पाटील आणि नमित बनसोडे यांच्यासह काही संशयितांनी मिळून सुमारे ३०० ते ४०० तरुणांना महापालिकेत नोकरी मिळवून देण्याचे गाजर दाखवले. आरोपींनी पालिकेचे बनावट लेटरहेड, शिक्के आणि लोगोचा वापर करून बनावट नियुक्तीपत्रे, वर्क ऑर्डर आणि प्रशिक्षणाचे डमी आदेश उमेदवारांना दिले होते. विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी पालिकेच्या मुख्य इमारतीजवळच मुलाखतींचा बनावट घाटही घातला गेला होता. या बदल्यात प्रत्येक उमेदवाराकडून ३० ते ४५ लाख रुपये उकळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (PMC)

PMC Fraud : महापालिकेत ‘टॅक्स’ कपातीचे आमिष दाखवून ६ लाखांचा गंडा

या घोटाळ्याची माहिती मिळताच पुणे महानगरपालिकेने पुढाकार घेत पीडित उमेदवारांशी संपर्क साधला. पुरावे गोळा करणे, त्यांचे विश्लेषण करणे आणि फसवणूक झालेल्या तरुणांचे समुपदेशन करून त्यांना कायदेशीर तक्रार देण्यासाठी प्रोत्साहित करण्यात प्रशासनाने महत्त्वाची भूमिका बजावली. या आधारावर पालिकेने स्वतःही स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. (PMC)

Prasad Malai Chaha : ‘प्रसाद मलाई चहा’ चा मालक गोत्यात: तरुणीवर विनयभंगाचा प्रयत्न

पोलीस आता या प्रकरणातील 'मनी ट्रेल'चा (पैशांचा व्यवहार) शोध घेणार आहेत. या रॅकेटचे जाळे किती खोलवर पसरले आहे आणि यात इतर कोणाचे हात गुंतलेले आहेत, याचा तपास आता पोलीस करत आहेत. महापालिका प्रशासनही या प्रकरणाचा पाठपुरावा करत असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. केवळ एका कर्मचाऱ्याच्या निलंबनावर न थांबता, या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करून सत्य बाहेर येणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. (PMC)

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

Share