PMC : डीबीटीद्वारे २२.९८ कोटी रुपये ५९ हजार विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा
पुणे, महाराष्ट्र मिरर
2 min read

PMC : पालकांनी तातडीने शालेय साहित्य खरेदी करण्याचे आवाहन
पुणे, महाराष्ट्र मिरर
PMC : पुणे महानगरपालिका शिक्षण विभागाच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या इयत्ता पहिली ते आठवी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य खरेदी करता यावे यासाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) योजनेअंतर्गत ५९ हजार ७९५ विद्यार्थ्यांच्या अथवा त्यांच्या पालकांच्या बँक खात्यांवर २२ कोटी ९८ लाख २ हजार ६८४ रुपये आज अखेर जमा करण्यात आले असून पालकांनी तातडीने शालेय साहित्य खरेदी करावे असे आवाहन स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भीमाले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. ( PMC dbt fund distribution primary students )

शालेय साहित्य खरेदीसाठी इयत्तानिहाय निधी विद्यार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे, त्याचा तपशील पुढील प्रमाणे
इयत्ता १ ली : २,२५० विद्यार्थी : ₹ ६४,९९७३१
इयत्ता २ री : ८,४०६ विद्यार्थी : ₹ २,१९,४२,४७५
इयत्ता ३ री : ९,०२३ विद्यार्थी : ₹ २,८३,१९,२२२
इयत्ता ४ थी : १०,०७८ विद्यार्थी : ₹ २,७९,८६,१४१
इयत्ता ५ वी : ९,०२९ विद्यार्थी : ₹ ४,२८,३८,३६२
इयत्ता ६ वी : ९,१२२ : ₹ ४,१८,८१,७६६
इयत्ता ७ वी : ८,४०७ विद्यार्थी : ₹ ४,३४,५९,१४०
इयत्ता ८ वी : ३,४८० विद्यार्थी : ₹ १,६८,७५,८४५.
एकूण : ५९,७९५ विद्यार्थी : ₹ २२,९८,०२६८४.
भिमाले म्हणाले, "बालवाडी-१, बालवाडी-२, इयत्ता पहिलीतील विद्यार्थी तसेच नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि ज्या विद्यार्थ्यांचा यू-डायस (U-DISE) प्रणालीवरील कायमस्वरूपी विद्यार्थी नोंदणी क्रमांक (PEN) तयार होण्याची प्रक्रिया सुरू आहे, त्यांचा पेन क्रमांक प्राप्त होताच डीबीटीद्वारे निधी हस्तांतरित करण्यात येईल. तसेच माध्यमिक विभागातील सुमारे १२ हजार विद्यार्थ्यांसाठी डीबीटीची बिलिंग प्रक्रिया सुरू असून ती १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण केली जाणार आहे." ( PMC )
Maharashtra Politics : राजकीय वर्तुळात खळबळ: शरद पवार गट एनडीएच्या वाटेवर ?
ते पुढे म्हणाले, "डीबीटीद्वारे मिळालेल्या निधीतून पालकांना गणवेश, दप्तर, बूट, मोजे, वह्या, रंगपेटी, चित्रकला साहित्य, शालेय स्टेशनरी, लिखाण साहित्य तसेच दर दोन वर्षांनी स्वेटर खरेदी करता येणार आहे. विद्यानिकेतन व क्रीडानिकेतन शाळांमधील विद्यार्थ्यांना त्यांच्या विशेष गरजेनुसार शालेय साहित्य स्वतंत्रपणे उपलब्ध करून दिले जाते."

श्रीनाथ भीमाले यांनी पालकांना आवाहन करताना सांगितले की, ज्या पालकांच्या खात्यावर डीबीटीची रक्कम जमा झाली आहे त्यांनी तातडीने शालेय साहित्य खरेदी करून त्याच्या पावत्या संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांकडे त्वरीत जमा कराव्यात, जेणेकरून प्रक्रियेची पूर्तता वेळेत होईल.
Pmc Politics : भाजप-राष्ट्रवादी युतीची दाट शक्यता
यंदाच्या वर्षी डीबीटी प्रक्रिया १८ जूनपासूनच सुरू करण्यात आली होती. विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे काही दिवसांचा विलंब झाला. गेल्या तीन वर्षांत ही प्रक्रिया प्रामुख्याने ऑगस्ट महिन्यात सुरू होत होती. त्यामुळे गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच शालेय साहित्य खरेदीसाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा प्रयत्न होता असे भीमाले यांनी स्पष्ट केले.( PMC )

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)


