Skip to content

PM Modi : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी खारघरमध्ये; महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ होणार भव्य सभा

पनवेल जितिन शेट्टी : रायगड, ठाणे शहर, नवी मुंबईतील महायुतीच्या उमेदवा रांच्या प्रचारार्थ गुरुवार दिनांक १४ नोव्हेंबर रोजी दुपारी ०३ वाजता खारघर येथे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Modi यांची भव्य जाहीर सभा होणार आहे.

V
Vivek

1 min read

PM Modi : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी खारघरमध्ये; महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ होणार भव्य सभा

पनवेल जितिन शेट्टी : रायगड, ठाणे शहर, नवी मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गुरुवार दिनांक १४ नोव्हेंबर रोजी दुपारी ०३ वाजता खारघर येथे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Modi यांची भव्य जाहीर सभा होणार आहे. सेक्टर २९ मधील मधील सेंट्रल पार्क जवळील मैदानात हि सभा होणार आहे. या सभेसाठी ५० हजार मतदार उपस्थित राहण्याची शक्यता असल्यामुळे भव्य व्यासपीठ उभारले आहे. त्याचबरोबर या सभेच्या तयारीबाबत आमदार प्रशांत ठाकूर MLA Prashant Thakur यांच्याकडून प्रत्यक्ष ठिकाणी पाहणी करून आढावा घेतला जात आहे. PM Modi Kharghar Sabha

पेठपाडा येथे हेलिपॅड

खारघर येथील पेठपाडा मेट्रो रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेल्या मैदानात हेलिपॅड उभारण्याचे काम सुरू आहे, तसेच या ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. श्वानपथकाद्वारे या जागेची तपासणी करण्यात येत आहे. सभा सुरळीत पार पडण्यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. PM Modi Kharghar Sabha

हेही वाचा: Salman Khan Death Threat: बॉलीवूडचा भाईजान सलमान खानला धमकी देणाऱ्या आरोपीने गाणे लिहिले होते, त्याला कर्नाटकातून अटक…'मैं सिकंदर हूं'…

Share