Skip to content

Mumbai News : पंतप्रधान मोदींचा आज महाराष्ट्र-गुजरात दौरा; ३५ हजार कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण

Mumbai News :मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, मंगळवारी (दि.८) महाराष्ट्र आणि गुजरातच्या दौऱ्यावर असणार आहेत.

VK
Vikrant Kulkarni

2 min read

पंतप्रधान मोदींचा आज महाराष्ट्र-गुजरात दौरा; ३५ हजार कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण वडोदऱ्यात विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि Gen-Z शी संवाद
पंतप्रधान मोदींचा आज महाराष्ट्र-गुजरात दौरा; ३५ हजार कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण वडोदऱ्यात विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि Gen-Z शी संवाद

Mumbai News : वडोदऱ्यात विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि Gen-Z शी संवाद


Mumbai News :मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, मंगळवारी (दि.८) महाराष्ट्र आणि गुजरातच्या दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यात ते सुमारे पस्तीस हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण, उद्घाटन आणि भूमिपूजन करणार आहेत. याशिवाय मुंबईत ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६’चे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.

वडोदऱ्यात विविध विकासकामांचे लोकार्पण


• पंतप्रधान मोदी आज (दु.८) दुपारी बारा वाजता वडोदरा येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण करतील.
• यावेळी ते सभेला संबोधित करणार असून Gen-Z युवा पिढीशी थेट संवाद साधणार आहेत.
• या विशेष कार्यक्रमासाठी सातशे मीटर लांबीचा रेड कार्पेट स्टेज तयार करण्यात आला आहे.

WDFCच्या तीन महत्त्वाच्या भागांचे लोकार्पण


• पंतप्रधान मोदी वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर (WDFC) च्या ३२६ किलोमीटर लांबीच्या तीन महत्त्वाच्या भागांचे राष्ट्राला समर्पण करतील.
• या प्रकल्पासाठी २०,७०० कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला आहे.
• यामध्ये साणंद (उत्तर)-मकरपुरा, न्यू उमरेगाव-न्यू सफाळे आणि न्यू सफाळे-जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी (JNPA) या मार्गांचा समावेश आहे.

तीन रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी


• पंतप्रधान मोदी ३२९ किलोमीटर लांबीच्या तीन रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत.
• या प्रकल्पांसाठी ९,७०० कोटी रुपयांहून अधिक खर्च होणार आहे.
• यामध्ये वडोदरा-रतलाम तिसरी आणि चौथी रेल्वे लाईन, मियागाम करजण-चोरांडा-मालसर गेज परिवर्तन आणि विश्वामित्री-दभोई रेल्वे लाईन दुहेरीकरण प्रकल्पांचा समावेश आहे.
• याशिवाय सुमारे १,७८० कोटी रुपये खर्चाच्या तीन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचीही पायाभरणी केली जाणार आहे.

मालगाडी सेवांना हिरवा झेंडा


• पंतप्रधान मोदी न्यू साणंद (उत्तर), न्यू मकरपुरा, न्यू उमरेगाव आणि मुंबईतील न्यू जेएनपीटी येथून मालगाडी सेवांना हिरवा झेंडा दाखवतील.
• तसेच वडोदरा आणि तांडा रोडदरम्यानच्या नवीन रेल्वे सेवेलाही हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे.
• या रेल्वे सेवेचा फायदा वडोदरा, छोटा उदेपूर आणि अलिराजपूर जिल्ह्यांतील नागरिकांना होणार आहे.

मुंबईत GFF-2026 चे उद्घाटन


• गुजरात दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी मुंबईत येणार असून, आज सायंकाळी पावणे सहा वाजता ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६चे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.
• ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट’ची सातवी आवृत्ती ८ ते ११ सप्टेंबरदरम्यान आयोजित करण्यात आली आहे.
• आर्थिक तंत्रज्ञान क्षेत्रातील ही जगातील महत्त्वाच्या आणि प्रभावशाली वार्षिक परिषदांपैकी एक मानली जाते.
• २०२० पासून GFF हे धोरणकर्ते, नियामक, मध्यवर्ती बँका, आर्थिक संस्था, फिनटेक कंपन्या, तंत्रज्ञान कंपन्या, गुंतवणूकदार आणि शिक्षणतज्ज्ञांसाठी आंतरराष्ट्रीय व्यासपीठ म्हणून विकसित झाले आहे.
• या परिषदेत वित्त क्षेत्राचे भविष्य, तंत्रज्ञानातील बदल आणि आर्थिक क्षेत्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा आणि विचारमंथन केले जाते.

Share