Skip to content

Pimpri News : विठ्ठलनगरमध्ये तरुणावर कोयत्याने हल्ला

Pimpri News :पिंपरी, महाराष्ट्र मिरर : पिंपरीमधील विठ्ठलनगर येथे जुन्या वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला.

VK
Vikrant Kulkarni

3 min read

विठ्ठलनगरमध्ये तरुणावर कोयत्याने हल्ला
विठ्ठलनगरमध्ये तरुणावर कोयत्याने हल्ला

Pimpri News : संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा

Pimpri News :पिंपरी, महाराष्ट्र मिरर : पिंपरीमधील विठ्ठलनगर येथे जुन्या वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. तिघांनी मिळून तरुणावर कोयत्याने वार केले. ही घटना शनिवारी (२४ ऑक्टोबर) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली.https://maharashtramirror.com/Pimpri News
या प्रकरणात विशाल सुभाष पौळ (२३, अजमेरा) यांनी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोशन रविंद्र कांबळे (२१, पिंपरी), नेपाळी समीर, एक अनोळखी तरुण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/Pimpri News
फिर्यादी विशाल आणि आरोपी रोशन हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. विशाल हे विठ्ठल नगर मधील पत्रा शेड येथे असताना आरोपी त्यांच्याजवळ आले. विशाल आणि रोशन यांच्यामध्ये मागील काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. त्या कारणावरून आरोपींनी संगनमत करून विशाल यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. त्यानंतर रोशन कांबळे याने कोयत्याने फिर्यादीच्या पाठीवर वार केले, तर दुसऱ्या आरोपीने चाकू मारण्याच्या उद्देशाने अंगावर धावून जात तिसऱ्या आरोपीने फिर्यादीच्या उजव्या डोळ्याच्या बाजूला मारून त्यांना जखमी केले. संत तुकारामनगर पोलीस तपास करत आहेत.https://maharashtramirror.com/Pimpri News


कपड्याच्या दुकानातून रोख रक्कम चोरी

अज्ञात महिलांविरोधात गुन्हा दाखल

पिंपरी, महाराष्ट्र मिरर : पिंपरीतील कपड्यांच्या बाजारातील एका दुकानात अज्ञात महिलांनी ७१ हजारांची रोख रक्कम लांबवली. ही घटना शनिवारी (२४ ऑक्टोबर) दुपारी कपडा मार्केटमधील ज्योती कलेक्शन शॉपमध्ये घडली.
या प्रकरणात कुमार भगवानदास रामचंदानी (४०, पिंपरी पुणे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी महिला व एक लहान मुलगी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांचे पिंपरी येथील कपडा मार्केटमधील दुकानात दोन अनोळखी महिला आणि एक लहान मुलगी यांनी संगनमत करून दुकानातून ७१ हजार ८०० रुपयांची रोख रक्कम चोरी करून नेली.
या प्रकरणी पिंपरी पोलीस पुढील तपास करत आहेत.


सुरक्षेची साधने न पुरवल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू

देहूरोड पोलिसात गुन्हा दाखल

पिंपरी, महाराष्ट्र मिरर : सुरक्षिततेची कोणतीही साधने उपलब्ध न करून दिल्याने मजुराचा पाय घसरून झालेल्या अपघातात मृत्यू झाला. ही घटना २२ ऑक्टोबर रोजी दुपारी थॉमस कॉलनी, मामुर्डी येथील एका बांधकाम साइटवर घडली. प्रकाश प्रल्हाद शाहू (३६, कोंढवा बुद्रुक, पुणे. मूळ रा. छत्तीसगड) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.
या प्रकरणी अमोल आनंदराव वाघमोडे (३२, देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हसीम आकेर बिश्वास (५२, मामुर्डी, हवेली, पुणे), राजु गुडडूसाहेब नदाफ (३८, येवलेवाडी, हवेली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बांधकाम साइटवर वॉटरप्रूफिंगचे काम करत असताना, बांधकाम मालक आणि ठेकेदाराने मजुरांच्या सुरक्षेसाठी सेफ्टी नेट, सेफ्टी बेल्ट, हेल्मेट किंवा सेफ्टी रेलिंग यांसारखे कोणतेही साहित्य उपलब्ध करून दिले नाही. त्यांच्या याच निष्काळजीपणामुळे मजुराचा पाय घसरून तो खाली सिमेंटच्या रस्त्यावर पडला. डोक्यास गंभीर दुखापत झाल्यामुळे या दुर्घटनेत मजुराचा मृत्यू झाला.
देहूरोड पोलीस तपास करत आहेत.


कोयता बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक

देहूरोड पोलिसांत गुन्हा दाखल

पिंपरी, महाराष्ट्र मिरर : सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे हत्यार बाळगून फिरणाऱ्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई शनिवारी (२४ ऑक्टोबर) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलसमोर, जुना पुणे-मुंबई रोड, देहूरोड येथे करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत माळी यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गणेश महाविरसिंग भंबक (२५, देहूगाव), वेदांत अशोक रोडे (२०, देहूगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
आरोपी हे सार्वजनिक रस्त्यावर फिरत असताना त्यांच्या ताब्यात ५०० रुपये किमतीचा लोखंडी कोयता मिळून आला. त्यांच्याकडे शस्त्र बाळगण्याबाबत कोणताही परवाना नव्हता. त्यामुळे दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी देहूरोड पोलीस तपास करत आहेत.

रावेतमध्ये ३ लाखांचे मेफेड्रॉन जप्त, दोन जण अटक

रावेत पोलिसांची कारवाई

पिंपरी, महाराष्ट्र मिरर : रावेत परिसरात अमली पदार्थाची अवैध विक्री करण्यासाठी बाळगणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी कारवाई करत अटक केली. ही कारवाई रविवारी (२५ ऑक्टोबर) पहाटे रावेत बीआरटी रोड लगत करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सौदागर लामतुरे यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.चैतन्य श्याम कांबळे (२०, रावेत), कैलाश देवजी चौधरी (२६, रावेत) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
रावेत बीआरटी रोड लगत दोघेजण एमडी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती रावेत पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन लाख १८ हजार रुपये किमतीचा १०६ ग्रॅम एमडी हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.
रावेत पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Share