Pimpri Spa Raid : स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; गुन्हे शाखेकडून छापा
Prostitution Racket Operating Under the Guise of a Spa Center; Crime Branch Conducts Raid
1 min read

पुणे : Pimpri Spa Raid : स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून या कारवाईत एकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई बुधवारी (१ एप्रिल) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास मुटकेवाडी, चाकण येथील ७ स्टार फॅमिली स्पा येथे करण्यात आली.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलीस कॉन्स्टेबल उदयकुमार भोसले यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गजानन बाळासाहेब सूर्यवंशी (४४, कात्रज, पुणे; मूळ- परभणी) याला अटक केली असून जागा मालक मोहन भानुदास तिस्तक (४०, पिंपळे सौदागर) याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गजानन हा स्पाच्या नावाखाली पीडित महिलेला पैशांचे आमिष दाखवून तिच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत होता. ज्या इमारतीत हा व्यवसाय सुरू होता, तिथे हॉस्पिटल आणि डायग्नोस्टिक सेंटर सारखी सार्वजनिक ठिकाणे असतानाही हा प्रकार सुरू होता. जागा मालकाने हा व्यवसाय चालवण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याने त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला. चाकण दक्षिण पोलीस तपास करीत आहेत. Pimpri Spa Raid
Prostitution Racket Operating Under the Guise of a Spa Center; Crime Branch Conducts Raid


