Pimpri News : पिंपरी एमआयडीसीत कामगारास अटक
Pimpri News : पिंपरी: इंजिनिअरिंग वर्कशॉपमधून चार लाखांहून अधिक रुपयांचे साहित्य आणि स्क्रॅप चोरणाऱ्या कामगाराला अटक करण्यात आली आहे.
1 min read

Pimpri News : कंपनीतील चार लाखांचे साहित्य चोरल्याचा आरोप
Pimpri News : पिंपरी: इंजिनिअरिंग वर्कशॉपमधून चार लाखांहून अधिक रुपयांचे साहित्य आणि स्क्रॅप चोरणाऱ्या कामगाराला अटक करण्यात आली आहे. ही घटना २६ जुलै ते २९ ऑगस्ट दरम्यान पिंपरी एमआयडीसीतील श्री युनिक्रिएट इंजिनिअरिंग वर्कशॉपमध्ये घडली.https://maharashtramirror.com/ pimpri News
या प्रकरणी रमेश हरीभाऊ लबडे (६१, रा. बोपोडी) यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कामगार प्रशांत कुमार (३६, रा. चिखली, मूळ- गुलबर्गा, कर्नाटक) याला अटक करण्यात आली आहे.https://maharashtramirror.com/ Pimpri News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने कंपनी मालकाच्या संमतीशिवाय स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ४ लाख १४ हजार ४०० रुपये किमतीचे साहित्य आणि स्क्रॅप कारबाईड इन्सर्टचे तुकडे चोरून नेले. कंपनीकडून साहित्याची मोजणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. संत तुकाराम नगर पोलीस तपास करीत आहेत.


